Student Of the Year 2: चित्रपटातील पहिलं गाणं रिलीज, तारा-अनन्यासोबत थिरकला टायगर श्रॉफ

बी टाऊन
Updated Apr 18, 2019 | 17:29 IST | टाइम्स नाऊ मराठी

SOTY 2: ‘स्टुडंट ऑफ द ईयर-२’ चित्रपटात किशोर कुमारचं जुनं गाणं ‘ये जवानी है दिवानी’ रिक्रिएट केलं गेलं आहे. १९७२ मध्ये आलेला चित्रपट ‘जवानी दिवानी’मध्ये रणधीर कपूर आणि जया बच्चनवर हे गाणं चित्रित झालं होतं.

Student of the year 2
स्टुडंट ऑफ द ईअर २  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: ‘स्टुडंट ऑफ द ईयर-२’चं पहिलं गाणं ‘गिली गिली अक्खा’ रिलीज झालं आहे. हे गाणं म्हणजे किशोर कुमार यांच्या ‘ये जवानी है दिवानी’ या गाण्याचं रिक्रिएशन आहे. १९७२ मध्ये आलेला चित्रपट ‘जवानी दिवानी’मध्ये रणधीर कपूर आणि जया बच्चनवर हे गाणं चित्रित झालं होतं. आता या गाण्यात आपल्याला टायगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि अनन्या पांडे दिसणार आहेत. गाण्यात या तिघांची जबरदस्त केमेस्ट्री बघायला मिळतेय. एकत्र जबरदस्त परफॉर्मन्स या गाण्यात तिघं करताना दिसत आहेत.

करण जोहरनं हे गाणं रिलीज करण्यापूर्वी एक क्लिप शेअर केली होती. ज्यात या गाण्याची झलक पाहायला मिळाली होती. तारा सुतारिया या गाण्याला मोस्ट ऑयकॉनिक साँग मानते तर अनन्या स्वत:ला खूप नशीबवान समजतेय की, तिला या गाण्यावर मोठ्या पडद्यावर डान्स करण्याची संधी मिळालीय. सोबतच या गाण्याबाबत टायगर श्रॉफ म्हणतो की, हे गाणं माझ्या वडिलांचं म्हणजेच जॅकी श्रॉफ यांचं खूप आवडतं गाणं आहे, ज्यावर आम्ही डान्स करतोय.

 

 

धर्मा प्रॉडक्शनचा अपकमिंग रोमँटिक ड्रामा चित्रपट म्हणजे ‘स्टुडंट ऑफ द ईअर २’. प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत खूप उत्सुकता आहे. मागील आठवड्यात चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता. आता प्रेक्षक चित्रपट रिलीज होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

 

 

चित्रपटात दोन अभिनेत्री अनन्या पांडे आणि तासा सुतारिया डेब्यू करत आहेत. दोघी पण जणी ट्रेलरमध्ये खूप ग्लॅमरस दिसत होत्या. तर टायगर श्रॉफ एकदम रफ अँड टफ लूकमध्ये दिसत आहे. चित्रपट ‘स्टुडंट ऑफ द ईअर २’ हा दिग्दर्शक करण जोहरचा २०१२ मध्ये आलेला ‘स्टुडंट ऑफ द ईअर’चा दुसरा भाग म्हणता येईल. पहिल्या चित्रपटात आलिया भट्ट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रानं डेब्यू केला होता. तर आता पार्ट-२ मध्ये तारा सुतारिया आणि अनन्या पांडे बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहेत.

 

 

स्टुडंट ऑफ द ईअर-२ मे महिन्यात होणार रिलीज

चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालेलं आहे. गेल्यावर्षी ९ एप्रिल २०१८ला चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं होतं. आता चित्रपट रिलीज व्हायला फक्त एक महिना उरलेला आहे. हा चित्रपट पुनीत मल्होत्रा दिग्दर्शित करत आहेत. स्टुडंट ऑफ द ईअर-२ हा चित्रपट धर्मा प्रॉडक्शन आणि फॉक्स स्टार स्टुडिओज यांनी मिळून बनवला आहे. चित्रपट पुढील महिन्यात म्हणजे १० मे २०१९ ला रिलीज होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Student Of the Year 2: चित्रपटातील पहिलं गाणं रिलीज, तारा-अनन्यासोबत थिरकला टायगर श्रॉफ Description: SOTY 2: ‘स्टुडंट ऑफ द ईयर-२’ चित्रपटात किशोर कुमारचं जुनं गाणं ‘ये जवानी है दिवानी’ रिक्रिएट केलं गेलं आहे. १९७२ मध्ये आलेला चित्रपट ‘जवानी दिवानी’मध्ये रणधीर कपूर आणि जया बच्चनवर हे गाणं चित्रित झालं होतं.
Loading...
Loading...
Loading...