Ram Setu : अक्षय कुमारचा 'राम सेतू'वादाच्या भोवऱ्यात, रामसेतूचा इतिहास चुकीचा दाखवल्याचा Bjp नेते सुब्रह्मण्यम स्वामींचा आरोप

बी टाऊन
Updated Aug 28, 2022 | 20:36 IST | टाइम्स नाऊ मराठी

Akshay Kumar Ram setu legal trouble : अक्षय कुमार (Akshay kumar) पुन्हा एकदा वादात सापडला आहे. राम सेतू सिनेमासाठी (Ram setu cinema) भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी (subramanian swamy) यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया.

Subramanian swamy issued legal notice notice to Akshay kumar and team
'राम सेतू' सिनेमाला कायदेशीर नोटीस  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अक्षय कुमारचा ‘राम सेतू’ हा सिनेमा रिलीजपूर्वीच वादात सापडला आहे.
  • भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी अक्षयला कायदेशीर नोटीस पाठवली आहे
  • सिनेमात रामसेतूचा इतिहास चुकीचा दाखवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Akshay Kumar Ram setu legal trouble : बॉलिवूडमध्ये सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. सिनेमाला बॉयकॉट करण्यापासून थेट स्टार्सना ट्रोल करण्यात येत आहे. लाल सिंग चड्ढा, रक्षाबंधन, लायगर या सिनेमांना बॉयकॉट ट्रेंड सुरू होता. आता अक्षय कुमारचा आगामी सिनेमा राम सेतू वादाच्या (Ramsetu cinema in troulbe) भोवऱ्यात अडकला आहे. रामसेतूचा इतिहास चुकीचा दाखवल्याचा, फेरफार केल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रह्मण्यम स्वामी (subramanian swamy) यांनी केला आहे. या सिनेमात अक्षय कुमार (Akshay Kumar) पुरातत्त्व शास्त्रज्ञाची भूमिका साकारत आहे. (Subramanian swamy issued legal notice notice to Akshay kumar and team)

अधिक वाचा : शाहीर साबळेंचा प्रवास रुपेरी पडद्यावर

पुरातत्वशास्त्रज्ञांना राम सेतूचे मिथक किंवा राम सेतू असल्याचा पुरावा सापडतो आणि याभोवती सिनेमाची कथा फिरते. मात्र, रामसेतूचा हा इतिहास सिनेमात चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचा आरोप भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामींनी केला आहे. भाजपचे माजी खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी सिनेमाशी संबंधित लोकांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.  

भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट केले आहे की, "मुंबईतल्या चित्रपटसृष्टीतील लोकांना खोटे आणि चुकीच्या गोष्टी दाखवण्याची सवय लागली आहे. त्यामुळे मी वकील सत्या सभरवाल यांच्यामार्फत अक्षय कुमार आणि राम सेतूशी संबंधित त्याच्या टीममधील 8 जणांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे." असं ट्विट भाजपचे माजी खासदार 
सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केले आहे. सिनेमात राम सेतू सिनेमातील इतिहास, तथ्य चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचा दावा नोटीशीमध्ये करण्यात आला आहे. 

सुब्रह्मण्यम स्वामी यांनी राम सेतूबाबत एकामागून एक अनेक ट्विट केले आहेत. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी अक्षय कुमारच्या नागरिकत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 

अधिक वाचा : आता मिळणार नाही या ब्रँडची व्हिस्की

रामसेतू सिनेमात अक्षय कुमारसह जॅकलिन फर्नांडिस, नुसरत भरूचा आणि सत्यदेव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 24 ऑक्टोबरला हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. रामसेतूशिवाय अक्षय कुमारकडे अनेक सिनेमा आहेत. लवकरच अक्षय कुमारचा कटपुतली हा सिनेमा रिलीज होणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी