KGF Chapter 2 : यशचा KGF Chapter 2, पहिल्याच दिवशी 100 कोटींच्या जवळपास पोहोचण्याची शक्यता

बी टाऊन
Updated Apr 09, 2022 | 20:09 IST | टाइम्स नाऊ मराठी

KGF Chapter 2 : यश, संजय दत्त आणि रवीना टंडन स्टारर KGF 2 साठी चाहते खूप उत्सुक आहेत. KGF Chapter 2 पहिल्याच दिवशी 100 कोटी कमावण्याची शक्यत वर्तवण्यात येत आहे.

KGF Chapter 2, likely to reach close to 100 crores on first day
केजीएफ पहिल्याच दिवशी 100 कोटी पोहोचण्याची शक्यता  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • केजीएफ रिलीजच्या पहिल्याच दिवशी 100 कोटी पोहोचण्याची शक्यता
  • हिंदी व्हर्जनही 30 कोटींची कमाई करू शकते
  • तेलगू, तामिळ आणि कन्नडचे कलेक्शनही 100 कोटी होऊ शकते

KGF Chapter 2 Box Office Prediction: 4 एप्रिल रोजी प्रेक्षकांची प्रतीक्षा अखेर संपेल आणि KGF Chapter 2 (KGF Chapter 2) थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यश  (Yash), संजय दत्त (Sanjay Dutt)आणि रवीना टंडन (Raveena Tandon)स्टारर KGF 2 साठी चाहते खूप उत्सुक आहेत. बाहुबली, केजीएफ, पुष्पा आणि आरआरआरच्या यशानंतर एकीकडे चाहते चित्रपटाची वाट पाहत आहेत, तर दुसरीकडे ट्रेड अॅनालिस्ट्सनाही आशा आहे की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करेल. KGF Chapter 2 पहिल्याच दिवशी 100 कोटी रुपये कमवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


KGF 2 ची हिंदी आवृत्ती 30 कोटींच्या आसपास कमाई करेल

चित्रपट आणि व्यापार विश्लेषक रमेश बाला म्हणाले, 'KGF Chapter 2 चे हिंदी व्हर्जन पहिल्याच दिवशी जवळपास 30-33 कोटींची कमाई करू शकते. दुसरीकडे, जर तुम्ही चित्रपटाच्या उर्वरित आवृत्त्यांचे म्हणजे तेलुगू, तामिळ आणि कन्नडचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जोडले तर पहिल्या दिवशी एकूण 90 कोटी रुपयांचे कलेक्शन होऊ शकते. 
म्हणजेच पहिल्याच दिवशी हा चित्रपट 100 कोटी क्लबच्या अगदी जवळ पोहोचू शकतो.

KGF 2 ला RRR चा लाभ मिळेल


साऊथ चित्रपटांच्या पॅन इंडियाच्या यशावर रमेश बाला म्हणाले, 'केजीएफ २ ला याचा थेट फायदा होईल, कारण यामुळे लोक सिनेमागृहांपर्यंत पोहोचत आहेत.आरआरआरनंतर साऊथच्या चित्रपटांकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पुष्पा आणि RRR नंतर, KGF Chapter 2 हा साऊथचा आणखी एक पॅन इंडिया चित्रपट आहे, 
ज्याचा नक्कीच फायदा होईल. यासोबतच रमेश बाला यांनी परदेशी कलेक्शनबद्दलही सांगितले.

परदेशातही या चित्रपटाला फायदा होणार आहे

'केजीएफ 2 परदेशातील पहिल्या भागापेक्षा चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे. कारण यूएस आणि यूकेमध्ये या चित्रपटाला चांगली आगाऊ बुकिंग मिळत आहे. 
केजीएफ चॅप्टर 2 तामिळनाडूमधील 250 थिएटरमध्ये रिलीज होणार आहे, तर हिंदी व्हर्जन उत्तर भारतात 3000हून अधिक स्क्रीनवर रिलीज होणार आहे. 

तीन सिनेमांमध्ये क्लॅश 

विशेष म्हणजे KGF 2 ची स्पर्धा शाहिद कपूर-मृणाल ठाकूर यांच्या जर्सीशी होईल. त्याचवेळी या दोन चित्रपटांसोबत थलपथी विजयचा बीस्ट हा चित्रपटही रिलीज होणार आहे.
तिन्ही चित्रपट मोठे असून त्यांचा एकमेकांच्या कलेक्शनवर प्रभाव पडू शकतो असे मानले जाते.तामिळनाडू आणि केरळमध्ये बीस्टचा दबदबा दिसण्याची शक्यता आहे. तर हिंदी पट्ट्यात बीस्ट केजीएफसमोर टिकणार नाही. तर जर्सीचा प्रकार वेगळा आहे, त्यामुळे त्याचे प्रेक्षकही वेगळे आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी