मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आणि तिचा नवरा सैफ अली खान लवकरच दुसऱ्यांदा आई-बाबा बनणार आहेत. दरम्यान, दोघेही आपले नवीन घर तयार करण्यात व्यस्त होते. दोघांनी काही दिवसांपूर्वीच हे घर विकत घेतले होते. सैफ- करीना सध्या वांद्रेच्या फॉर्च्यून हाइटमध्ये राहतात आणि तिचे नवीन घर या घराच्या जवळच आहे. या नवीन इमारतींमध्ये त्याने टॉपचे दोन मजले विकत घेतले आहेत. ज्यामध्ये ते लवकरच शिफ्ट होणार आहेत. करीनाचे वडील रणधीर कपूर यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
रणधीर कपूर यांनी दिला दुजोरा
टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना रणधीर कपूर यांनी याची या वृत्ताला दुजोरा दिला आहे की, करीना-सैफ नवीन घरात शिफ्ट होणार आहेत. रणधीर म्हणाले, 'हो, ते नव्या घरात शिफ्ट होत आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांनी हे घर खरेदी केलं होतं. ज्याचं काम आता पूर्ण झालं आहे. ते शिफ्ट होणार आहेत परंतु मला अद्याप तारीख माहित नाही.
करीनाचे नवीन घर असे असेल
करिनाच्या या नवीन घराची रचना फार्चून हाइटमधील घराचे डिझाइन करणार्या दर्शनी शाह यांनी डिझाइन केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीच्या नवीन घरात बाल्कनी, नर्सरी, मोठी खोल्या आणि एक मोठी लायब्ररी असेल जिथे सैफ आपला वेळ घालवू शकेल. कारण सैफला पुस्तके वाचण्याची बरीच आवड आहे.
करीनाने शेअर केली ही पोस्ट
करीनाने अलीकडेच सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये याची पुष्टी केली की ती लवकरच आपल्या नवीन घरात शिफ्ट होईल. करीनाने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे ज्यामध्ये ती करिश्मा कपूर, मलायका अरोरा, अमृता अरोरा आणि मल्लिका भट्ट सोबत दिसत आहे. हा फोटो पोस्ट करत करीनाने लिहिले की ती एका नवीन गोष्टीच्या दिशेने वाटचाल करत आहे.