Ranbir Alia Wedding: रणबीर आलियाच्या बहुचर्चित लग्नामध्ये अशी असणार सुरक्षा; पाहा व्हिडिओ 

बी टाऊन
Updated Apr 08, 2022 | 15:35 IST | टाइम्स नाऊ मराठी

Alia Bhatt Wedding Date | रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या बहुचर्चित लग्नाची तयारी जोरात सुरु आहे. माध्यमांच्या माहितीनुसार १७ एप्रिल रोजी हे जोडपं लग्नबंधनात अडकणार आहे. तसेच लग्नासाठी दिग्गज मंडळी हजेरी लावणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Such will be the security at Ranbir Alia's much talked about wedding Watch the video
रणबीर आलियाच्या बहुचर्चित लग्नामध्ये अशी असणार सुरक्षा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या बहुचर्चित लग्नाची तयारी जोरात सुरु आहे.
  • १७ एप्रिलला आलिया आणि रणबीरचा विवाह सोहळा पार पडणार आहे.
  • या लग्नाआधी आलियाच्या मैत्रिणींची बॅचलर पार्टी होणार आहे.

Alia Bhatt Wedding Date | मुंबई : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या बहुचर्चित लग्नाची तयारी जोरात सुरु आहे. माध्यमांच्या माहितीनुसार १७ एप्रिल रोजी हे जोडपं लग्नबंधनात अडकणार आहे. तसेच लग्नासाठी दिग्गज मंडळी हजेरी लावणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यासाठी लग्नातील पाहुण्यांच्या सुरक्षेसाठी पाहुण्यांनीही  जोरदार तयारी केली आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या टीमने लग्नाच्या जागेची पाहणी सुरू केली आहे. याशिवाय आलिया भट्टने लग्नापूर्वी बॅचलर पार्टीचे आयोजन केले आहे. (Such will be the security at Ranbir Alia's much talked about wedding Watch the video). 

अधिक वाचा : १० पट वेगाने पसरणाऱ्या XE व्हेरिएंटचा भारतात शिरकाव?

रणबीर-आलियाच्या लग्नाशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये आलिया भट्टचा मॅनेजर आणि सिक्युरिटी हेड रणबीर कपूरच्या बिल्डिंगची वास्तू काढत आहे. माहितीनुसार, या ठिकाणी रणबीर आणि आलियाच्या लग्नाचे विधी पार पडणार आहेत. लग्नातील पाहुण्यांच्या सुरक्षेसाठी टीम पूर्ण तयारी करत आहे. व्हिडिओमध्ये आलियाचा प्रचारक निलुफर कुरेशी, सिक्युरिटी हेड युसूफ भाई आणि तिची मॅनेजर गरिश्मा दिसत आहे. 

अधिक वाचा : ज्योतिरादित्य सिंधियांच्या दिल्लीतील बंगल्याची कहाणी...

मित्रमंडळीसाठी बॅचलर पार्टी 

आलिया भट्टच्या लग्नाआधी तिच्या मैत्रिणींची बॅचलर पार्टी होणार आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, आलिया भट्टची बेस्ट फ्रेंड आकांक्षा आणि अनुष्का या पार्टीचे आयोजन करणार आहेत. ही पार्टी अनुष्काच्या घरी होणार आहे. पाहुण्यांच्या यादीत आलिया भट्टच्या बालपणीच्या मित्रांचाही समावेश असणार आहे. आलियाशिवाय रणबीर कपूरनेही बॅचलर पार्टी आयोजित केली आहे. यामध्ये अर्जुन कपूर, आदित्य रॉय कपूर आणि अयान मुखर्जी या बॅचलर पार्टीत सहभागी होऊ शकतात.

alia bhatt and ranbir kapoor marriage

मुलाच्या लग्नासाठी नीतू कपूर सज्ज

रणबीर कपूरची आई आणि अभिनेत्री नीतू कपूर यांच्याबद्दल भाष्य करायचे झाले तर ती तिच्या मुलाच्या लग्नासाठी खूप उत्सुक आहे. एवढेच नाही तर लग्नासाठी अभिनेत्रीने आपले आउटफिटही तयार केले आहेत. पिंकविलाच्या बातमीनुसार, नीतू कपूर मनीष मल्होत्राने डिझाइन केलेल्या आउटफिटमध्ये दिसणार आहे.

माहितीनुसार, बुधवारी बुधवारी नीतू कपूरने मनीष मल्होत्राच्या स्टोअरमधून तिचे कपडे घेतले आहेत. लग्नाआधी नीतूसह टीममधील काही मेंबर दुकानातून रणबीरच्या वांद्रे येथील घरापर्यंत पोशाखांची पॅकेट घेऊन जाताना दिसले.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी