पाहा पूर्वीपेक्षा किती बदललीए सुहाना खान, हा फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

बी टाऊन
Updated Sep 20, 2019 | 20:03 IST | टाइम्स नाऊ मराठी

Suhana Khan: शाहरुख खानची मुलगी सुहाना हिचा एक जुना फोटो नुकताच समोर आला आहे. ज्यामध्ये सुहाना खूपच वेगळी दिसते आहे. सुहानाचा हा फोटो पाहून तुम्हाला लक्षात येईल की ती आता किती बदलली आहे.

suhana khan old picture share on instagram see many changes in shuhana
सुहाना खान  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • बॉलिवूड अभिनेता शाहरुखच्या मुलीचा एक जुना फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल 
  • या फोटोमध्ये सुहाना आई गौरी खानसोबत एका इव्हेंटमध्ये दिसते आहे. 
  • सुहानाचा हा फोटो शनाया कपूरची आई महीप कपूर हिने शेअर केला आहे. 

मुंबई: शाहरुख खानची मुलगी सुहाना ही नेहमीच चर्चेत असते. तिचे फोटो देखील सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत असतात. नुकताच तिचा एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत होती. या फोटोमध्ये सुहानाने केस बांधलेले होते. तर तिन ब्राऊन रंगाचा टॉप परिधान केला होता. तिचा हा फोटो तिच्या चाहत्यांना खूपच आवडला होता. ज्याला सोशल मीडियावर खूपच लाइक्स मिळाले होते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Tea mo suuu bebe ???

A post shared by suhana khan ( READ BIO PLS) (@suhanakha2) on

आता सुहानाचा आणखी एक फोटो समोर आला आहे. जो खूपच जुना आहे. या फोटोमध्ये सुहाना आपल्या दोन मैत्रिणी अनन्या पांडे आणि शनाया कपूर यांच्यासोबत दिसते आङे. यासोबतच सुहानाची आई गौरी देखील या फोटोमध्ये आहे. हा फोटो शनायाची आई आणि अभिनेता संजय कपूरची पत्नी महीप कपूर हिने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये आपण पाहू शकता की, सुहानाची पर्सनालिटी आता केवढी बदलली आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#TimeFlies

A post shared by Maheep Kapoor (@maheepkapoor) on

 

महीपने जो फोटो शेअर केला आहे त्यामध्ये सुहानाने ब्ल्यू रंगाचा लाँग सूट परिधान केला आहे. या फोटोमध्ये सुहाना खूपच साधी दिसते आहे. पण आता सुहाना पूर्वीपेक्षा खूपच ग्लॅमरस दिसू लागली आहे. या फोटोमध्ये अनन्या पांडेने गुलाबी रंगाचा सूट घातला आहे. तर शनायाने निळ रंगाचा सूट घातला आहे. हा फोटो शेअर करताना महीपने असं कॅप्शन दिलं आहे की, 'टाइम फ्लाइज'

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

When u smile I smile coz I love your smile baby #Suhanakhan

A post shared by suhana khan ( READ BIO PLS) (@suhanakha2) on

 

सध्या सुहाना ही न्यूयॉर्कमध्ये आहे. जिथे ती तिच्या उच्चशिक्षणासाठी गेली आहे. सुहानाने न्यूयॉर्क विद्यापीठात पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला आहे. दरम्यान, याआधी सुहानाची आई गौरी खान हिने सुहानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये सुहाना तिच्या कॉलेजच्या पहिल्याच दिवशी ती राणी मुखर्जीसारखी एंट्री मारत असल्याचं दिसून आलं. तिचा हा व्हिडिओ देखील खूप व्हायरल झाला होता.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

I smile when I see you smile

A post shared by suhana khan ( READ BIO PLS) (@suhanakha2) on

न्यूयॉर्कमध्ये उच्च शिक्षणासाठी जाण्याआधी सुहानाने आपलं ग्रॅज्युएशन काही दिवसांपूर्वीच इंग्लंडमधील आर्डिंग्ली विद्यापीठातून पूर्ण केलं होतं. इंग्लंडमध्ये असताना देखील सुहाना आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करायची.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...