म्हणून चर्चेत आलं सुहाना खानचं इंस्टाग्राम अकाऊंट, सिनेमात डेब्यू करण्याची शक्यता? 

बी टाऊन
पूजा विचारे
Updated Mar 09, 2020 | 15:55 IST

गेल्या अनेक दिवसांपासून कोणत्यान कोणत्या कारणावरुन सुहाना ट्रेंडिगमध्ये असते. सुहाना तशी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह नाही आहे. मात्र कोणत्यातरी सुपरस्टारप्रमाणे तिचे बरेच फॅनपेज आहेत.

Suhana khan
म्हणून चर्चेत आलं सुहाना खानचं इंस्टाग्राम अकाऊंट, सिनेमात डेब्यू करण्याची शक्यता?   |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबईः सध्या बॉलिवूडमध्ये स्टारकिड्सचा जमाना आहे. बऱ्याच बॉलिवूडच्या एक्टर आणि एक्ट्रेसेसच्या मुलांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे. तर काही जण डेब्यूची तयारी करत आहेत. त्यातले काही स्टार किड्स असेही आहेत, जे कोणत्या सिनेमात डेब्यू करण्याआधीच स्टार बनलेत. यापैकीच एक आहे बॉलिवूडचा किंग खान म्हणजे शाहरुख खानची मुलगी सुहाना खान. गेल्या अनेक दिवसांपासून कोणत्यान कोणत्या कारणावरुन सुहाना ट्रेंडिगमध्ये असते. सुहाना तशी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह नाही आहे. मात्र कोणत्यातरी सुपरस्टारप्रमाणे तिचे बरेच फॅनपेज आहेत. त्यात आता सुहाना आपल्या एका इंस्टाग्राम अकाऊंटमुळे चर्चेत आली आहे. असं सांगितलं जातंय की, हे सुहानाचं ऑफिशियल इंस्टाग्राम अकाऊंट आहे. 

इंस्टाग्रामवर 'suhanakhan2' नावानं एक इंस्टाग्राम अकाऊंट आहे. जो आताच वेरिफाय झाला आहे. या अकाऊंटवर कित्येक दिवसांपासून फोटो शेअर केले जात होते. जेव्हा या अकाऊंटवर ब्लू टिक आलं तेव्हा मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगितलं जात आहे की, हे सुहाना खानचं ऑफिशियल इंस्टाग्राम अकाऊंट आहे. या अकाऊंटवर सुहानाचे फोटोज 2017 पासून शेअर होत आहेत. मात्र आता या अकाऊंटला ब्लू टिक का आलं? याबाबत काही माहिती मिळू शकली नाही आहे. तसंच या अकाऊंटच्या माध्यमातून सुहाना खाननं इंस्टाग्रामवर डेब्यू केलं आहे की नाही किंवा तिचं हे कोणतंतरी फॅनपेज अकाऊंट आहे, हे अद्याप समजू शकलेलं नाही. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Three’s a crowd

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2) on

दरम्यान इंस्टाग्राम अकाऊंटवरुन सुहानानं कोणतंही घोषणा केली नाही. अशातत हे सुहानाचं ऑफिशियल अकाऊंट आहे किंना नाही हे आपल्याला स्पष्ट समजू शकणार नाहीत. तर या ब्लू टिक असलेल्या अकाऊंटवर सुहानाचे बरेच फोटो पोस्ट केलेले आहेत. या अकाऊंटमध्ये मित्रांसोबत, भावंडांसोबत तसंच आई गौरीसोबतचे फोटो शेअर केलेत. पण या अकाऊंटमध्ये वडिल शाहरुख सोबतचा फोटो शेअर केलेला नाही. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Her lips are devil red and her skin’s the colour of mocha

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2) on

जर खरंच सुहानानं इंस्टाग्रामवर डेब्यू केलं असेल तर नक्कीच त्यामागे काही तरी हेतू असेल. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुहाना लवकरच सिनेमांमध्ये डेब्यू करण्याची शक्यता आहे आणि आपल्या पहिल्या प्रोजेक्टपासून सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहून फॅन्ससोबत नातं बनवू इच्छित असेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी