Sunil shetty got angry : अथिया आणि केएल राहुलच्या लग्नाची बातमी ऐकून सुनील शेट्टी संतापला

Sunil shetty got angry on a website for fake news of athiya shetty and kl rahul marriage : भारतीय क्रिकेटपटू के. एल. राहुल आणि अथिया शेट्टी यांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. ही बातमी कळताच बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी संतापला.

Sunil shetty got angry on a website for fake news of athiya shetty and kl rahul marriage
अथिया आणि केएल राहुलच्या लग्नाची बातमी ऐकून सुनील शेट्टी संतापला 
थोडं पण कामाचं
  • अथिया आणि केएल राहुलच्या लग्नाची बातमी ऐकून सुनील शेट्टी संतापला
  • वेबसाइटच्या ट्विटर हँडलला टॅग करून केले ट्वीट
  • जाहीर केली नाराजी

Sunil shetty got angry on a website for fake news of athiya shetty and kl rahul marriage : मुंबई : भारतीय क्रिकेटपटू के. एल. राहुल आणि अथिया शेट्टी यांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. ही बातमी कळताच बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी संतापला. त्याने अथिया आणि केएल राहुलच्या लग्नाची बातमी देणाऱ्या वेबसाइटला टॅग करून बातमी खोटी असल्याचे जाहीर केले. 

के. एल. राहुल आणि अथिया शेट्टी २०२२ मध्ये लग्न करणार अशा स्वरुपाची बातमी एका वेबसाइटने दिली. ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली. पण ही बातमी खोटी असल्याचे जाहीर करून सुनील शेट्टी यांनी वेबसाइटच्या वृत्तांकनाविषयी आपली नाराजी व्यक्त केली. 

सुनील शेट्टी यांनी बातमी कळल्यानंतर ट्विटरवर संबंधित वेबसाइटच्या ट्विटर हँडलला टॅग करून ट्वीट केले. 'मी ही बातमी वाचली आणि मला कळलंच नाही की मी आनंदी होऊ की दुःखी. मला कळत नाही की सत्य काय आहे हे माहिती नसताना कोणी अशी बातमी कशी देऊ शकतं. अशा बेजबाबदार रिपोर्टिंमुळे पत्रकारितेचे नाव खराब होतं आहे. तुम्ही अशा बातम्या कसे देऊ शकता'; अशी प्रतिक्रिया सुनील शेट्टी यांनी दिली. 

काही दिवसांपूर्वी के. एल. राहुल आणि अथिया शेट्टी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून रिलेशनशिपमध्ये असल्याचे जाहीर केले होते. याआधी अनेकदा के. एल. राहुल खेळत असताना संबंधित मॅच बघण्यासाठी आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी अथिया शेट्टी स्टेडियममध्ये आल्याचे अनेकांनी बघितले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी