Turkey-Syria earthquake : तुर्की-सीरियामध्ये नुकत्याच झालेल्या भूकंपानंतर तेथील लोकांची स्थिती गंभीर आहे. ६ फेब्रुवारी रोजी तुर्कस्तानमध्ये ७.८ रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर तुर्कस्तान उद्ध्वस्त झाला आहे. आताही तिथल्या मृतांची संख्या वाढत आहे. तुर्कीमध्ये सुमारे 3,45,000 अपार्टमेंट्स नष्ट झाली आहेत. अनेक लोक अजूनही बेपत्ता आहेत. तुर्कीमध्ये मृत लोकांची संख्या 40,642 आहे, तर सीरियामध्ये 5,800 पेक्षा जास्त आहे. या आपत्तीवर बॉलिवूड स्टार्सनीही शोक व्यक्त केला असून प्रत्येकजण त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहे.
आता अभिनेत्री सनी लिओनीने तुर्की आणि सीरियाला मदतीचा हात पुढे केला आहे. सनी लियोनी आणि तिचा नवरा डॅनियल वेबर देखील तुर्की आणि सीरियातील पीडितांसाठी आपले योगदान देत आहेत. या जोडप्याने त्यांच्या कॉस्मेटिक ब्रँडच्या फेब्रुवारीच्या कमाईतील 10 टक्के रक्कम सीरिया आणि तुर्कीमधील भूकंपग्रस्त लोकांच्या मदतीसाठी दान करण्याचा निर्णय घेतला आहे. सनी लिओन म्हणाली की प्रत्येकाने मदतीचा हात पुढे करणे आवश्यक आहे आणि लोकांना 'वाचलेल्यांना त्यांचे जीवन पुन्हा तयार करण्यासाठी' मदत करण्याचे आवाहन केले.
सनी लिओनीपूर्वी प्रियांका चोप्रानेही भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी हात पुढे करण्याचे आवाहन केले आहे. अभिनेत्रीने लिहिले, 'एक आठवड्यानंतर, विनाशकारी भूकंपानंतर तुर्की आणि सीरियाच्या लोकांच्या वेदना आणि त्रास सुरूच आहे. बचाव कार्य सुरू आहे, ज्यामुळे असे काही आशादायक क्षण आले जेथे 3 महिन्यांच्या बाळाला ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. याशिवाय त्यांनी लोकांना मदतीचे आवाहनही केले.