पाहा अभिनेत्री सनी लिओनीचं नवं आयटम साँग

बी टाऊन
Updated Jun 20, 2019 | 17:44 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sunny Leone item song: अभिनेता दिलजीत दोसांझ याचा आगामी सिनेमा अर्जुन पटियाला यामध्ये अभिनेत्री सनी लिओनी ही एक आयटम साँग करणार आहे. 

sunny_instagram
पाहा अभिनेत्री सनी लिओनीचं नवं आयटम साँग  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: बॉलिवूड अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझ याचा आगामी सिनेमा अर्जुन पटियालाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. हा ट्रेलर खूपच भन्नाट आहे. अनेकांना हा ट्रेलर पसंत पडत आहे. या सिनेमात दिलजीतशिवाय अभिनेत्री कृति सेनन आणि वरुण शर्मा हे लीड रोलमध्ये दिसून येतील. याशिवाय या सिनेमात अभिनेत्री सनी लिओनी हिचं आयटम साँग देखील असणार आहे. रिलीज झालेल्या सिनेमात सनीची एक झलकही पाहायला मिळाली आहे. ज्यामध्ये ती दिलजीत दोसांझसोबत डान्स करताना दिसून येतेय. ट्रेलरमध्ये सनी लिओनी ही नियॉन ग्रीन कलरच्या टॉप आणि ब्लॅक कलरच्या शिमरी बॉटममध्ये दिसून येत आहे. सनीचा हा लूक तिला खूपच सूट होतोय. ज्यामध्ये ती बोल्ड आणि ब्यूटीफुल दिसते आहे. 

सनी लिओनीने काही पहिल्यांदाच सिनेमात आयटम साँग केलेलं नाही. सनीने शाहरुख खानच्या रईस सिनेमात लैला में लैला, शूटआऊट अॅट वडालामध्ये लैला, भूमि मध्ये ट्रिपि-ट्रिपि आणि रागिनी एमएमएसमध्ये बेबी डॉल गाण्यावर आयटम साँग केलं आहे. तिचे आतापर्यंतचे सगळे आयटम साँग हे तिच्या चाहत्यांना पसंत पडले आहेत. त्यामुळेच फॅन्सना आशा आहे की, आगामी सिनेमातील सनी लिओनीचं गाणं देखील हिट असेल. तर सनीलाही विश्वास आहे की, ती आपल्या चाहत्यांचं मन नक्कीच जिंकेल. 

सिनेमाच्या ट्रेलरचा विचार केल्यास तो खूपच भन्नाट आहे. जे प्रेक्षकांना फारच हसवून सोडतो. यामध्ये दिलजीत हा कृतिच्या प्रेमात आकंठ बुडालेला दिसतो आहे. तर दुसरीकडे या सिनेमातील इतर कलाकारही आपल्या दमदार कॉमेडीने चाहत्यांना खिळवून ठेवतात. हा ट्रेलर आज (गुरुवार) सकाळी ११ वाजता रिलीज झाला असून याला काही तासांमध्येच १५ लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 

याआधी १९ जूनला या सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं होतं. ज्यामध्ये तीन स्टार एकाच बाइकवर बसलेले दिसून येत आहेत. इथे दिलजीत आणि वरुण हा पोलिसांच्या वर्दीत दिसत आहेत. तर कृति माइक हातात घेत असल्याचं दिसतं आहे. या सिनेमाचं पोस्टर आणि ट्रेलर पाहिल्यास लक्षात येतं की, हा सिनेमा प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करेल. 

या सिनेमात वरुणचं नाव ओनिडा असणार आहे तर कृतिचं नाव रितु असणार आहे. जी पत्रकाराची भूमिका साकारणार आहे. तर दिलजीत हा एका छोट्या शहरातून आलेला आणि पोलिसाच्या भूमिकेत दिसेल. हा सिनेमा एका छोट्या शहरातील असल्याचं दाखवण्यात आलं आहे. हा सिनेमा २६ जुलैला प्रदर्शित होणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
पाहा अभिनेत्री सनी लिओनीचं नवं आयटम साँग Description: Sunny Leone item song: अभिनेता दिलजीत दोसांझ याचा आगामी सिनेमा अर्जुन पटियाला यामध्ये अभिनेत्री सनी लिओनी ही एक आयटम साँग करणार आहे. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles