सनी लिओनी चित्रपटसृष्टीतील त्या सुंदर आणि हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांचे फोटोज नेहमीच व्हायरल होत असतात तसेच चर्चेतही असतात. चाहते सुद्धा अभिनेत्री सनी लिओनीच्या नव्या फोटोजची वाट पाहत असतात. सनी लिओनीची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतूर असतात.
नेहमी स्विमसूट किंवा हॉट फोटोज शेअर करणाऱ्या अभिनेत्री सनी लिओनीने आता दाक्षिणात्य लूकमध्ये फोटोशूट केलं आहे. सनी लिओनीचे हे फोटोज सोशल मीडियात खूपच व्हायरल होत आहेत.
सनी लिओनीने हे फोटोज केरळमध्ये क्लिक केले आहेत. या फोटोजमध्ये सनी लिओनी दाक्षिणात्य लूकमध्ये दिसत आहे. फोटोजमध्ये सनी गुलाबी रांगाचे कपडे परिधान केल्याचं पहायला मिळत आहे. सनीने काळावर टिकली लावली आहे तर हातात गुलाबी रंगाच्या बांगड्या घातल्या आहेत.
सनी लिओनी या फोटोजमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. सनी लिओनीने हे फोटोज शेअर करताच अवघ्या तीन तासांत फोटोजला ११ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले होते. एका फोटोमध्ये सनी लिओनी होडीत बसलेली दिसत आहे. तर दुसऱ्यात सनी लिओनीचा क्लोजअप क्लिक केलेला फोटो दिसत आहे.
सनी लिओनीचा हा नवा अंदाज तिच्या चाहत्यांनाही फार आवडत आहे. हे फोटोज शेअर करताना सनी लिओनीने कॅप्शनमध्ये लिहिलं, "आपल्या देशातील केरळच्या प्रेमात मी पडले आहे."
वर्कफ्रंटचं बोलायचं झालं तर आगामी वेब सीरिज 'अनामिका' मुळे सनी लिओनी खूपच चर्चेत आहे. या वेब सीरिजचं दिग्दर्शन विक्रम भट्ट करत आहेत.