Suryavanshi: 'सूर्यवंशी'चा बॉक्स ऑफिसवर दबदबा, केली छप्पर फाड कमाई, कोटीच्या कोटी उड्डाणे

बी टाऊन
विजय तावडे
Updated Nov 24, 2021 | 19:13 IST

Suryavanshi:दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी'ने अपेक्षेप्रमाणेच बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा कायम ठेवलाय. कोविडनंतर रिलीज होणारा बिग बजेट, मल्टीस्टारर सूर्यवंशीने प्रेक्षकांची मनं जिंकलीयेत. लवकरच हा सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल..

'Suryavanshi' dominates the box office, soon join 200 crore club
'सूर्यवंशी'ची छप्पर फाड कमाई, 200 कोटींच्या क्लबकडे वाटचाल  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी'ने फोडले फटाके
  • अक्षय-अजय-रणवीरची बॉक्स ऑफिसवर जादू
  • लवकरच 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार

नवी दिल्ली : Suryavanshi: अक्षय कुमार (Akshay kumar) आणि कतरिना कैफ (katrina kaif)चा 'सूर्यवंशी' (Suryavanshi)चा 
19 व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम आहे. रिलीज झाल्यापासून हा चित्रपट कमाईच्या बाबतीत वेगाने धावत आहे आणि आता 'सूर्यवंशी' (Suryavanshi) लवकरच 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. 'सूर्यवंशी'(Suryavanshi)ने रिलीजच्या 19व्या दिवशीही चांगली कमाई केली आहे. तरण आदर्श आणि बॉक्स ऑफिस इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाने सोमवारी सुमारे 2 कोटींची कमाई केली आहे.


अक्षय कुमार (Akshay kumar),अजय देवगण (ajay devgan),रणवीर सिंग (ranvir singh),कतरिना कैफ (katrina kaif) अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या 'सूर्यवंशी'(Suryavanshi)नेरविवारी तब्बल 1.88 कोटींची कमाई केली. आतापर्यंत या चित्रपटाची एकूण कमाई 180 कोटींच्या वर पोहोचली आहे. आता तो दिवस दूर नाही जेव्हा अक्षय आणि कतरिनाचा चित्रपट 200 कोटींचा जादुई आकडा पार करेल. दिवाळीच्या मुहूर्तावर 5 नोव्हेंबरला 'सूर्यवंशी' (Suryavanshi) चित्रपटगृहात रिलीज झाला. सूर्यवंशी देशभरात 4 हजारहून अधिक स्क्रीनवर रिलीज झाला आहे, तर जगभरात तो 5 हजार 200 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे.

अक्षय कुमार (Akshay kumar)च्या 'सूर्यवंशी' (Suryavanshi)ची कथा ही डीसीपी वीर सूर्यवंशीची आहे, जो आपल्या मतांवर ठाम आहे आणि दहशतवादाविरुद्ध युद्ध लढतो. या लढ्यादरम्यान त्याला एका मोठ्या कटाची कल्पना येते आणि तो देश आणि मुंबई वाचवण्यासाठी निघतो. त्याच्या या मिशनमध्ये सिंघम अजय देवगण (ajay devgan) आणि सिम्बा रणवीर सिंग(ranvir singh)ही त्याला मदत करत आहेत. ऍक्शन, ड्रामा आणि कार स्टंटमध्ये हातखंडा असलेल्या रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी'मध्ये यावेळी हेलिकॉप्टरवर ऍक्शन सीन्स पाहायला मिळत आहेत. असा हा सूर्यवंशी (Suryavanshi)प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरतोय असं म्हणायला हरकत नाही.. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी