सुशांत प्रकरणात आर्थिक अफरातफरीचा गुन्हा, रियाची चौकशी होणार

Sushant case ED files money laundering case सक्तववसुली संचालनालयाने प्राथमिक माहिती घेऊन आर्थिक अफरातफरीचा गुन्हा दाखल केला आहे. रिया आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

Sushant case ED files money laundering case
सुशांत प्रकरणात आर्थिक अफरातफरीचा गुन्हा, रियाची चौकशी होणार 

थोडं पण कामाचं

  • सुशांत प्रकरणात आर्थिक अफरातफरीचा गुन्हा, रियाची चौकशी होणार
  • प्राथमिक माहितीआधारे आर्थिक अफरातफरीचा गुन्हा दाखल
  • रिया आणि तिच्या कुटुंबाची चौकशी होण्याची शक्यता

मुंबईः अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या प्रकरणात आता वेगाने नवनवी माहिती हाती येत आहे. सुशांतने सुरू केलेल्या कंपन्यांमधून अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचे कुटुंब आर्थिक अफरातफर करत होते का, याची चौकशी होणार आहे. बिहार पोलिसांच्या विनंतीवरुन सक्तववसुली संचालनालयाने (Enforcement Directorate - ED) प्राथमिक माहिती घेऊन आर्थिक अफरातफरीचा गुन्हा दाखल केला (Sushant Singh Rajput case ED files money laundering case) आहे. या प्रकरणात रिया आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. तपासानंतर आणखी गंभीर गुन्ह्यांची नोंद केली जाण्याची शक्यता आहे.

सुशांतच्या वडिलांनी बिहारमध्ये पाटणा येथील राजेंद्रनगर पोलीस ठाण्यात एक तक्रार केली आहे. या तक्रारीत त्यांनी रिया आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांनी सुशांतला लुबाडल्याचा आरोप केला होता. या तक्रारीआधारे बिहार पोलिसांची एक टीम तपास करण्यासाठी मुंबईत आली. त्यांनी सुशांतच्या सर्व बँक खात्यांचे व्यवहार तपासले. या तपासानंतर बिहार पोलिसांनी आर्थिक गुन्ह्यांचा सखोल तपास करणाऱ्या सक्तवसुली संचालनालयाला एक पत्र पाठवले. पत्राद्वारे बिहार पोलिसांनी आर्थिक व्यवहारांच्या सखोल तपासणीची आवश्यकता सांगून तपास करण्याची विनंती केली. ईडीने मागणी केल्यानंतर बिहार पोलिसांनी सुशांतच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीची प्रत त्यांना पाठवून दिली तसेच पोलीस तपासाची प्राथमिक माहिती दिली. या माहितीआधारे ईडीने आर्थिक अफरातफरीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. लवकरच रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांना चौकशीसाठी समन्स बजावले जाण्याची शक्यता आहे. 

सुशांतने मागील वर्षभरात चार कंपन्या सुरू केल्या. या सर्व कंपन्यांच्या कारभारात सुशांतपेक्षा रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबातील सदस्य जास्त लक्ष घालत होते. या कंपन्या नेमके काय काम करत होत्या आणि त्यासाठी वित्त पुरवठा कशा प्रकारे व्हायचा या संदर्भात चौकशी होणार आहे. तसेच कंपन्यांच्या खात्यांमधून झालेल्या काही संशयास्पद आर्थिक व्यवहारांची चौकशी ईडी करणार आहे. सुशांतच्या वैयक्तिक बँक खात्यांमधून वळत्या झालेल्या पैशांचा वापर कशाप्रकारे झाला, सुशांतचे किती पैसे कंपन्यांमार्फत वेगेवगळ्या खात्यांमधून फिरवण्यात आले आणि त्यामागचा उद्देश काय हे जाणून घेतले जाणार आहे. 

मुंबई पोलिसांच्या तपासावर सुशांतच्या कुटुंबातील सदस्यांना अविश्वास

सुशांतच्या कुटुंबातील सदस्यांनी मुंबई पोलिसांच्या तपास कामावर अविश्वास जाहीर केला आहे. मुंबई पोलिसांनी सुशांतच्या बँक खात्यांची आणि आर्थिक व्यवहारांची जास्त माहिती घेतली नाही. तपास योग्य दिशेने सुरू आहे असे मुंबई पोलीस सांगतात पण त्यांनी रिया आणि तिच्या कुटुंबाविरोधात एकही आर्थिक गैरव्यवहार केल्याचा गुन्हा दाखल केलेला नाही, असे सुशांतच्या नातलगांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. मुंबई पोलीस तपास करत असताना सीबीआय तपासाची मागणी करणारी रिया बिहार पोलिसांनी चौकशी सुरू करताच सर्व तपास मुंबई पोलिसांनी करावा, अशी भूमिका घेत आहे. अचानक मुंबई पोलिसांच्या कामावर रियाला प्रचंड विश्वास वाटण्यामागचे रहस्य काय आहे, असा प्रश्न सुशांतच्या नातलगांनी उपस्थित केला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी