सुशांत सिंह राजपूतच्या खास मित्राने केला खुलासा, अंकिता लोखंडेचे रडून रडून हाल

बी टाऊन
Updated Jun 27, 2020 | 19:05 IST | टाइम्स नाऊ मराठी

sushant singh rajput suicide case: सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर त्याचा बेस्टफ्रेंड संदीप सिंहने मौन सोडले आहे. संदीपने सांगितले की अंकिताची रडून रडून वाईट अवस्था झाली आहे.

sushant singh rajput
सुशांत सिंह राजपूतच्या खास मित्राने केला खुलासा 

थोडं पण कामाचं

  • सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर त्याचा सगळ्यात जवळचा मित्र संदीप सिंहने मौन सोडले आहे. 
  • संदीप सिंहने सांगितले की अंकिता लोखंडेची रडून रडून वाईट अवस्था झाली आहे. 
  • अंकिता लोखंडे ब्रेकअपनंतरही सुशांतसाठी प्रार्थना करत होती. 

मुंबई: सुशांत सिंह राजपूत(sushant singh rajput)च्या निधनानंतर आता त्याचा सगळ्यात जवळचा मित्र संदीप सिंहने आपले मौन सोडले आहे. संदीप सिंहने सांगितले की सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेची(ankita lokhande) रडून रडून वाईट  अवस्था होती. वेबसाईट spotboye शी बातचीत करताना सुशांतच्या मित्राने संदीप सिंहने सांगितले की अंकिता लोखंडे केवळ त्याची गर्लफ्रेंड नव्हती. त्याने सुशांतच्या जीवनात त्याच्या आईची जागा घेतली होती. मी आपल्या २० वर्षांच्या करियरमध्ये तिच्यासारखी मुलगी पाहिली नव्हती. 

संदीपच्या मते अंकिता ते काम करत होते जे सुशांतसाठी ठीक होते. ती सुशांतच्या मनानुसार तयार होत होती. त्याच्या आवडीचे जेवण बनवत असे. त्यांच्या घराचे इंटीरियरही सुशांतच्या आवडीचे होते. ते सुशांतच्या आनंदासाठी त्याच्या आवडीचे प्रत्येक काम करत असे. 

सुशांतसाठी नेहमी करायची प्रार्थना

संदीपने एका मुलाखतीत सांगितले की - अंकिता जेव्हा करियरच्या उंचीवर होती तेव्हा तीने अॅक्टिंग सोडून दिली होती. ती एक टीव्हीचे मोठे नाव होते. तिला सिनेमांच्या ऑफर येत होत्या. मी प्रार्थना करतो की प्रत्येक मुलगी अंकिता प्रमाणे असावी 

ब्रेकअपनंतर सुशांतचे जेवढे सिनेमे रिलीज होत होते तेव्हा दर शुक्रवारी ती प्रार्थना करत असे. जेव्हा सुशांतच्या मृत्यूची बातमी मिळाली तेव्हा मला सगळ्यात जास्त चिंता अंकिताची होती. घरापासून ते रुग्णालपर्यंतच्या प्रवासादरम्यान मी केवळ अंकिताला कॉल करत होतो. मात्र तिने फोन उचलला नाही. 

रडून रडून अंकिताचे हाल

संदीपनुसार पोस्टमार्टम संपल्यानंतर मी अंकिता लोखंडेच्या घरी गेलो होतो. मी तिला १० वर्षांपासून ओळखत होतो. मात्र तिने एके दिवशी मला मिठी मारली. आजही जेव्हा मी तिच्याशी बोलो तेव्हा ती रडायला लागते. 

संदीप पुढे म्हणाला, मी अंकिताला अशा अवस्थेत पाहू शकत नाही. मात्र ती एक मजबूत मुलगी आहे. ती सुशांइतकीच हुशार आहे. मी तुम्हाला सांगू शकतो की सुशांत आणि अंकिता एकमेकांसाठी काय होते. 

पवित्र रिश्ता मालिकेतून समोर आली जोडी

पवित्र रिश्ता या मालिकेतून सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे यांची जोडी समोर आली होती. या मालिकेत अंकिताने अर्चनाची तर सुशांत सिंह राजपूतने मानवची भूमिका साकारली होती. या मालिकेत त्यांची केमिस्ट्री जबरदस्त होती. दोघांना मानव आणि अर्चना याच नावाने लोक ओळखत होते. दोघांना या मालिकेने स्टार बनवले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी