सुशांत सिंह राजपूतचा अंतिम पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर, मृत्युचं कारण...

Sushant Singh Rajput Final Postmortem Report: सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणात अंतिम पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. या अंतिम पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये नेमकं काय आहे जाणून घेऊयात...

Sushant Singh Rajput
सुशांत सिंह राजपूत 

थोडं पण कामाचं

  • १४ जून रोजी सुशांत सिंह राजपूत याने राहत्या घरात गेली आत्महत्या 
  • मुंबईतील कूपर रुग्णालयात झालं सुशांतचं शवविच्छेदन 
  • सुशांत सिंह राजपूतचा अंतिम शवविच्छेदन अहवाल आता समोर आला आहे

Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरणात पोलिसांकडे त्याच्या पोस्टमार्टमचा अंतिम रिपोर्ट (Final Postmortem Report) आला आहे. सुशांतने आपल्या राहत्या घरात १४ जून रोजी आत्महत्या केली होती. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी (Postmortem) कूपर रुग्णालयात पाठवला होता. त्यावेळी त्याच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मृत्युचं कारण हे Asphyxia असल्याचं म्हटलं होतं. म्हणजेच ज्यावेळी शरीराला ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नाही तेव्हा श्वासोच्छवास घेण्यास अडथळा येतो. त्यानंतर आता सुशांतचा अंतिम पोस्टमार्टम रिपोर्ट आला आहे. 

काय आहे अंतिम पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये?

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील त्याच्या शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल पोलिसांकडे आला आहे. या अंतिम अहवालात म्हटले आहे की, सुशांत सिंह राजपूत याचा मृत्यू हा फाशी घेतल्यामुळेच झाला आहे. एकूण ५ डॉक्टरांच्या टीमने सुशांतच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टचे विश्लेषण केले आहे. पोस्टमार्टमच्या सविस्तर रिपोर्टनुसार, Asphyxia आणि गळफास हे मृत्युचं नेमकं कारण आहे. मात्र अध्याप व्हिसेरा रिपोर्ट आलेला नाहीये आणि त्याची प्रतीक्षा मुंबई पोलिसांना आहे.

मुंबई पोलिसांच्या मते, सुशांत सिंह राजपूत याचा गळा आवळून हत्या केल्याचा शंका काहींनी उपस्थित केली होती. मात्र, तपासात तसे काहीही आढळून आलेले नाहीये. सुशांत सिंह राजपूत याच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या झटापटीचे व्रण, जखमा किंवा नख लागल्याचे व्रण आढळून आलेले नाहीयेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अद्याप डॉक्टरांचा जबाब नोंदवण्यात आलेला नाहीये. सुशांत सिंह राजपूत याचा सीए (CA) याचा जबाब आज मुंबई पोलीस घेत आहेत. आतापर्यंत पोलिसांनी जवळपास २३ जणांचे जबाब नोंदवले आहेत. २०१२ मध्ये सुशांत सिंह राजपूत याने YRF सोबत एक करार केला होता. तपासात असे समोर आले आहे की, सुशांतच्या सिनेमांबाबत शेवटचे संभाषण त्याचे मॅनेजर उदय सिंह गौरी यांच्यासोबत झाले होते.

सुशांत सिंह राजपूत याचा मृतदेह १४ जून रोजी त्याच्या मुंबईतील वांद्रे परिसरात राहत्या घरात आढळला होता. सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर येताच सर्वांनाच एक मोठा झटका बसला होता. त्यानंतर सुशांत डिप्रेशनमध्ये असल्याचंही अनेकांनी म्हटलं होतं. त्यामुळे मुंबई पोलीस विविध अँगल्सने या प्रकरणी तपास करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी