सुशांत-सारा संदर्भात मोठा गौप्यस्फोट

Sushant Singh Rajput former driver revealed अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री सारा अली खान यांच्याविषयी सुशांतच्या त्यावेळच्या ड्रायव्हरने मोठा गौप्यस्फोट केला.

Sushant Singh Rajput former driver revealed
सुशांत-सारा संदर्भात मोठा गौप्यस्फोट 

थोडं पण कामाचं

  • सुशांत-सारा संदर्भात मोठा गौप्यस्फोट
  • सुशांतच्या त्यावेळच्या ड्रायव्हरने दिली माहिती
  • नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला ड्रायव्हरने दिली साक्ष

मुंबईः अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Actor Sushant Singh Rajput) आणि अभिनेत्री सारा अली खान (Actress Sara Ali Khan) यांच्याविषयी सुशांतच्या त्यावेळच्या ड्रायव्हरने मोठा गौप्यस्फोट केला. नोकरी करत असताना कायम सुशांतसोबत असायचो. सारा आणि सुशांतच्या भेटीगाठी माझ्या समोरच झाल्याचे ड्रायव्हरने सांगितले. सुशांत आणि साराविषयी त्याने महत्त्वाची माहिती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला (Narcotics Control Bureau - NCB) दिली. (Sushant Singh Rajput former driver revealed in front of Narcotics Control Bureau)

सुशांत-सारा संदर्भात मोठा गौप्यस्फोट, सुशांतच्या त्यावेळच्या ड्रायव्हरने दिली माहिती

केदारनाथ (Kedarnath Movie) सिनेमाच्या निमित्ताने सुशांत आणि सारा यांची केमिस्ट्री जुळली. दोघे एकमेकांसोबत गप्पा मारताना अनेकदा दिसत होते. सेटवर दोघे अनेकदा एकत्र बोलत असल्याचे अनेकांनी बघितले होते. सिनेमाच्या वेगवेगळ्या कामांच्या निमित्ताने अडीच महिने सुशांत आणि सारा वारंवार एकमेकांना भेटत होते, बोलत होते. या कालावधीत घर ते सेट आणि सेट ते घर हा प्रवास सुशांतने कायम स्वतःच्या कारमधून केला. ही कार सुशांतचा ड्रायव्हर चालवायचा. सुशांत सिनेमाचे शूटिंग सुरू असतानाच्या दिवसांमध्ये फिटनेस जपण्यासाठी नियमितपणे जिममध्ये जायचा, व्यायाम करायचा तसेच स्विमिंग करायचा. याच काळात साराचे सुशांतच्या घरी येणे-जाणे वाढले होते, असे त्याच्या ड्रायव्हरने सांगितले.

अडीच महिने सिनेमाच्या शूटिंगमुळे सुशांत रुटीन व्यवस्थित फॉलो करत होता. या काळात एकदा सुशांत आणि सारा दोघे सुशांतच्या पवना येथील बंगल्यावर गेले होते. दोघे थायलंडला गेले होते. थायलंडवरुन आल्यानंतर जेमतेम दहा दिवसांनी सुशांतच्या सोनचिडिया सिनेमाचे रिलीज होते. त्या गडबडीमुळे असेल पण थायलंडवरुन आल्यानंतर सुशांत आणि सारा एकमेकांच्या संपर्कात दिसले नाही. केदारनाथ आणि बिग बॉस या दोन्हीच्या शूटिंगच्या निमित्ताने सुशांत आणि साराने एकत्र प्रवास करणे पसंत केल्याचे ड्रायव्हरने सांगितले. 

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला ड्रायव्हरने दिली साक्ष, सुशांत-सारा संदर्भात दिली महत्त्वाची माहिती

माझ्यासमोर सुशांत आणि सारा यांच्या भेटीगाठी झाल्या, गप्पाही झाल्या पण त्या दोघांनी कधीही अंमली पदार्थांचे सेवन केले नाही. माझ्यासमोर दोघांनी कधीही अंमली पदार्थ घेतले किंवा मागवले नाही; असे सुशांतच्या त्यावेळच्या ड्रायव्हरने सांगितले.

अंमली पदार्थ प्रकरणी अटक होण्याआधी रिया चक्रवर्तीने (Rhea Chakraborty) एनसीबीला सारा अली खान अंमली पदार्थांचे सेवन करते असे सांगितले होते. सारासह रियाने बॉलिवूडमधील २५ जणांची नावं एनसीबीला सांगितल्याचे वृत्त आहे. या प्रकरणी लवकरच एनसीबी सारा अली खान हिची चौकशी करण्याची शक्यता आहे.

एनसीबीला बॉलिवूडमधील ड्रग्स गँगविषयी माहिती देणारी रिया सध्या न्यायालयीन कोठडीत भायखळ्याच्या तुरुंगात आहे. तिला एनसीबीने अटक केली आहे. 

ड्रग्स प्रकरणी रियाने सांगितले सारा, रकुलप्रीतचे नाव

अंमली पदार्थ प्रकरणी (Drugs Case) रिया चक्रवर्ती (rhea chakraborty) हिने सारा अली खान (sara ali khan) आणि रकुलप्रीत सिंग (rakulpreet singh) या दोन अभिनेत्रींचे तसेच डिझायनर (designer) सिमोन खंबाटाचे (simone khambatta) नाव घेतले. रियाने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला (Narcotics Control Bureau - NCB) २० पानी साक्ष दिली. यात बॉलिवूडशी संबंधित २५ जणांची नावं आहेत. लवकरच या प्रकरणात चौकशी होण्याची शक्यता आहे. सारा अली खान आणि रकुलप्रीत सिंग या दोघींना एनसीबीकडून समन्स बजावले जाण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी