सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, मुंबई : बॉलिवुड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या ( actor Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर लगेचच बॉलिवुडमध्ये आतल्या आणि बाहेरच्या लोकांबद्दल (discussion about insiders and outsiders in Bollywood) नवी चर्चा सुरू झाली आहे. याबद्दल बराच वादही (arguments) सुरू आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका बातमीनुसार सुशांतच्या मित्राची साक्ष (Sushant’s friend’s statement) देत असे सांगण्यात आले आहे की सुशांतचे सारा अली खानसोबत बरेच चांगले संबंध होते आणि ते दोघे रिलेशनशिपमध्येही होते (Sushant and Sara Ali Khan relationship). पण नंतर साराने सुशांतशी ब्रेकअप (Sara broke up) केला होता. आता यावरून कंगना राणावतने ट्विटरवर सारा अली खानचा समाचार (Kangana Ranaut tweers and targets Sara) घेतला आहे.
कंगनाने ट्विटरवर लिहिले आहे, “सारा आणि सुशांतच्या अफेअरबद्दलच्या बातम्या माध्यमांमध्ये सगळीकडे ऐकायला मिळाल्या होत्या. ते दोघे बाहेर असताना एकाच खोलीत राहिलेही होते. ही फॅन्सी नेपोटिझम मुले कमकुवत असलेल्या बाहेरून आलेल्यांना स्वप्ने दाखवून त्यांना कचऱ्यात का फेकून देतात? त्यानंतर तो एका गिधाडाच्या प्रेमात पडला यात काहीच आश्चर्य नाही.”
या बातमीनुसार सुशांत सिंह राजपूतचा मित्र सॅम्यूएल हाओकिपने दिलेल्या माहितीनुसार ‘केदारनाथ’ चित्रपटाच्या प्रोमोशनदरम्यान सारा आणि सुशांत एकमेकांच्या प्रेमात होते, अगदी लहान मुलांसारखे. ते एकमेकांचा खूप आदर करत, जो आजकाल रिलेशनशिपमध्ये फारच कमी पाहायला मिळतो.
सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे दिला आहे. सीबीआयने रिया चक्रवर्तीसह इतर सहा जणांवर एफआयआर दाखल केली आहे.