सुशांत सिंह राजपूतची हत्या की आत्महत्या? एका वर्षानंतरही त्याच्या मृत्यूचे गूढ कायम

बी टाऊन
Updated Jun 14, 2021 | 11:11 IST | टाइम्स नाऊ मराठी

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला आज म्हणजेच 14 जून रोजी एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्याच्या मृत्यूच्या भोवतीचे संशयाचे आणि रहस्याचे जाळे मात्र अजून कायम आहे. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे.

Sushant Singh Rajput
सुशांत सिंह राजपूतची हत्या की आत्महत्या? एका वर्षानंतरही त्याच्या मृत्यूचे गूढ कायम  |  फोटो सौजन्य: Indiatimes

थोडं पण कामाचं

  • अनेक सेलिब्रिटींची करण्यात आली चौकशी
  • बिहार पोलिसांचा प्रवेश आणि राजकारणाला ऊत
  • पाच यंत्रणांकडून तपास, मात्र हाती शून्यच

मुंबई: बॉलीवूड (Bollywood) अभिनेता (actor) सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूला (death) आज म्हणजेच 14 जून रोजी एक वर्ष (one year) पूर्ण झाले आहे. त्याच्या मृत्यूच्या भोवतीचे संशयाचे (suspicion) आणि रहस्याचे (mystery) जाळे मात्र अजून कायम आहे. सीबीआय (CBI) या प्रकरणाचा तपास (investigation) करत आहे. त्यापूर्वी मुंबई पोलीस (Mumbai Police) त्याच्या मृत्यूचा तपास करत होते आणि नंतर बिहार पोलिसांनीही (Bihar police) यात भाग घेतला होता, मात्र मुंबई पोलिसांच्या तपासात काही त्रुटी (flaws) आढळल्यामुळे नंतर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) हा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवला होता.

अनेक सेलिब्रिटींची करण्यात आली चौकशी

14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह वांद्रे इथल्या त्याच्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. मुंबई पोलिसांनी या घटनेनंतर दोन दिवसांनी त्याच्या कुटुंबियांचे जबाब नोंदवले. त्यांच्या तपासात सुशांतने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. यादरम्यान अनेक सेलिब्रिटींचीही चौकशी करण्यात आली, मात्र त्याच्या कुटुंबियांनी मात्र त्याने आत्महत्या केलेली नसून त्याची हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त केला आणि मुंबई पोलीस सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केला.

बिहार पोलिसांचा प्रवेश आणि राजकारणाला ऊत

मुंबई पोलिसांच्या सुशांत सिंह प्रकरणाच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्याच्या कुटुंबियांनी बिहार पोलिसांत धाव घेतली. सुशांतरी गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीविरोधात त्यांनी तक्रार नोंदवली आणि बिहार पोलीस मुंबईत दाखल झाले ज्यानंतर मुंबई पोलीस विरुद्ध बिहार पोलीस असा वाद रंगला. अखेर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयच्या हाती सोपवला.

पाच यंत्रणांकडून तपास, मात्र हाती शून्यच

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात नंतर ड्रग्सचाही संबंध समोर आला, त्यामुळे मुंबई पोलीस, बिहार पोलीस आणि सीबीआयसोबतच अंमली पदार्थविरोधी पथकही तपासात आले. रिया चक्रवर्तीने सुशांतच्या पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप केला गेला, त्यामुळे प्रवर्तन निदेशनालयानेही तपासात भाग घेतला. अशा एकूण पाच वेगवेगळ्या यंत्रणांनी गेल्या वर्षभरात हे प्रकरण हाताळले, देशभरात अनेक ठिकाणी ड्रग्सप्रकरणी छापे टाकले, अनेक सेलिब्रिटीजची चौकशीही झाली. रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावाला अटकही झाली. मात्र एवढे करूनही सुशांतही हत्या की आत्महत्या हे गूढ अद्याप कायम आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी