Sushant Singh death case: सुशांतच्या बहिणीची मदतीसाठी पंतप्रधानांना साद

Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी दररोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. आता सुशांतसिंहच्या बहिणीने ट्वीटरवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे या प्रकरणी मदतीची मागणी केली आहे. 

Sushant Singh Rajput and Shweta Singh Kirti
सुशांत सिंह राजपूत आणि श्वेता सिंह   |  फोटो सौजन्य: Instagram

सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरणात दररोज नवीन घडामोडी घडत आहेत. शुक्रवारी अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिने एक व्हिडिओ रिलीज करत न्यायाची मागणी केली. तर आता सुशांतची बहीण श्वेता सिंग किर्ती (Shweta Singh Kirti) हिने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे या प्रकरणी न्याय मिळावा यासाठी अपील केलं आहे. सुशांतसिंह राजपूत याची बहीण श्वेता हिने ट्वीट करत या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्वीटरवर टॅग करत सुशांतसिंह राजपूतची बहीण श्वेता सिंह किर्ती हिने लिहिले आहे की, मी सुशांतसिंह राजपूतची बहीण आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची त्वरित चौकशी करण्याची विनंती करते. आम्ही भारतीय न्यायप्रणालीवर विश्वास ठेवतो आणि न्याय मिळण्याची अपेक्षा करतो. #JusticeForSushant #Satyamevajayate.

यासोबतच श्वेताने लिहिलं आहे की, "सर, माझे मन सांगत आहे की आपण सत्यासाठी आणि सत्याच्यासोबत उभे राहता. आम्ही अगदी सामान्य कुटुंबातील आहोत. माझ्या भावाचा बॉलिवूडमध्ये कुणीही गॉडफादर नव्हता, आताही कोणी गॉडफादर नाही माझी विनंती आहे की, या प्रकरणात आपण लक्ष द्या आणि सर्व काही तपास योग्य प्रकारे होईल याची काळजी घ्या. पुराव्यांसोबत छेडछाड होऊ नये. न्याय मिळेल या अपेक्षेत आम्ही आहोत.

सुशांतसिंह राजपूत याची बहीण श्वेता सिंह किर्ती आपल्या भावाला न्याय मिळावा यासाठी सोशल मीडियावर सतत विनवणी करत आहे. तसेच श्वेता सिंह सोशल मीडियाच्या माध्यमातून #Justiceforsushantsinghrajput या हॅशटॅगने कॅम्पेनही चालवत आहे.

सीबीआय चौकशीची होतेय वारंवार मागणी

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी अनेकजण करत आहेत. अभिनेते शेखर सुमन यांनी शुक्रवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन सुशांत सिंह राजपुत प्रकरणाची सीबीआय. मार्फत चौकशी करण्यासंदर्भात निवेदन दिले. यावेळी आसिफ भामला व अरुण मोटवानी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी