सुशांत सिंह राजपूत आत्महत्या: 'त्या' दिवशी सुशांतने दोनदा केला आत्महत्येचा प्रयत्न! 

बी टाऊन
रोहित गोळे
Updated Jun 28, 2020 | 14:57 IST

Sushant Singh Rajput Tried Twice Commit Suicide: सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूबद्दल आणखी एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. असे सांगितले जात आहे की सुशांतने 2 वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

sushant singh rajput
सुशांत सिंह राजपूत  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • सुशांत सिंग राजपूतने १४ जून रोजी त्याच्या मुंबईतील राहत्या घरात केली होती आत्महत्या
  • सुशांतने प्रत्यक्षात आत्महत्या केल्याचे वैद्यकीय अहवालात समोर आले आहे.
  • सुशांतने २ वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येमुळे संपूर्ण देशाला एका मोठा धक्का बसला होता. त्याच्या आत्महत्येनंतर त्याचे बरेच चाहते हे यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना आधार देत आहेत. यावेळी अनेक चाहत्यांनी असा दावा आहे की सुशांत सिंह राजपूत आत्महत्या करू शकत नाही, पण त्याच्यासोबत काहीतरी भयंकर घडलं असणार म्हणून त्याने असं पाऊल उचललं असणार. दरम्यान, मुंबई पोलीस आणि वैद्यकीय अहवालानुसार, ही आत्महत्याच आहे.  

दरम्यान, सुशांत सिंहच्या मृत्यूबद्दल आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. टीव्ही 9 वृत्त वाहिनीच्या एका न्यूज अँकरने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये असे म्हटले आहे की, मुंबई पोलिसांच्या तपासानुसार, सुशांतने २ वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. सुरुवातीला त्याने बाथरोबच्या बेल्टने गळफास घेण्याचा प्रयत्न केला पण बेल्ट तेवढं वजन पेलू शकलं नाही आणि तो तुटला. त्यानंतर सुशांत सिंह राजपूतने त्याच्या कपाटात ठेवलेल्या कपड्यांपैकी एक कुर्ता काढला आणि त्याने गळफास घेतला. 

२७ जणांचे जबाब नोंदवले 

सुशांत सिंह राजपूत याने १४ जून रोजी त्याच्या मुंबईतील राहत्या घरात आत्महत्या केली होती. त्यावेळी प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न आला की, सुशांतने असे टोकाचे पाऊल का उचलले? या प्रकरणी मुंबई पोलीस सातत्याने तपास करत आहे. आतापर्यंत पोलिसांनी  एकूण २७ जणांचा जबाब नोंदवला आहे. पोलिसांनी शनिवारी सांगितले की, ते प्रत्येक गोष्ट पडताळून त्या दिशेने या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सुशांतने आत्महत्या का केली? 

डीसीपी (झोन-९) अभिषेक त्रिमुखे म्हणाले की, 'सुशांतचा सविस्तर पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आहे आणि डॉक्टरांनी त्याच्या मृत्यूचे कारण गळफास असल्याचेच घोषित केले आहे. याशिवाय इतर जे नमुने घेण्यात आले आहेत. ते देखील विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. सुशांतने आत्महत्या का केली याविषयी पोलिस सर्व बाजूने तपास करत आहेत.' ते पुढे म्हणाले की, 'चौकशीत काहीही उघड होताच पोलीस तुम्हाला नक्कीच त्याबाबत सांगतील. मी तुम्हाला खात्री देतो की, मुंबई पोलीस हे प्रकरण अत्यंत व्यावसायिक पद्धतीने हाताळत आहेत. आपण पोलिसांवर विश्वास ठेवा, जे काही सत्य असेल ते समोर येईलच.' 

सुशांत सिंहची मुंबईतील वांद्रेमध्ये आत्महत्या 

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा मृतदेह मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरात आढळला होता. सुशांत सिंह राजपूत याच्या शवविच्छेदनाचा अहवाल आला आहे आणि त्यामध्ये गळफास घेतल्याने मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. सुशांतच्या आत्महत्येने संपूर्ण बॉलिवूडला एक मोठा धक्का बसला आहे. सुशांतने आत्महत्या का केली या मागचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये. मुंबई पोलीस विविध अँगल्सने या प्रकरणाचा तपास करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी