Boycott Pathan trend: 'पठाण' फ्लॉप करण्यासाठी सुशांत सिंगच्या चाहत्यांनी कंबर कसली, सोशल मीडियावर Pathan ला Boycott करण्याची मागणी

बी टाऊन
Updated Nov 03, 2022 | 15:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sushant Singh Rajput's Fans Boycott Pathan: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान(Shahrukh khan) च्या 'पठाण'(Pathan movie) सिनेमाचा टीझर रिलीज झाल्यानंतर त्यावर बहिष्कार घालण्याची मागणी करण्यात आली आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे (Sushant Singh Rajput) चाहते शाहरुख खानचा सिनेमा पाहू नका अशी सतत मागणी करताना दिसत आहेत.

Sushant Singh Rajput's Fans wants Boycott Pathan teending on twitter
'पठाण' सिनेमा बॉयकॉट करण्याची मागणी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ट्विटरवर शाहरुख खानच्या 'पठाण' सिनेमाला बॉयकॉट करण्याची मागणी
  • ट्विटरवर #BoycottPathan ट्रेंड होत आहे.
  • 'पठाण'चा टीझर रिलीज, शाहरुख-दीपिका प्रमुख भूमिकेत

Sushant Singh Rajput's Fans Boycott Pathan: बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा (Shahrukh khan) कमबॅक सिनेमा 'पठाण'चा (Pathan movie) टीझर त्याच्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त रिलीज करण्यात आला. शाहरुख खान स्टारर सिनेमाचा टीझर आणि अभिनेत्याचा फर्स्ट लूक पाहण्यासाठी प्रेक्षक बराच वेळ वाट पाहत होते. 2018 मध्ये रिलीज झालेल्या 'झिरो' सिनेमात शाहरुख खान शेवटचा दिसला होता. या सिनेमाच्या अपयशानंतर शाहरुख खान चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात होता. सिनेमाचा टीझर पाहिल्यानंतर प्रेक्षकांची खात्री पटली आहे की,शाहरुखचे पुनरागमन खूप दमदार असणार आहे. एकीकडे शाहरुखचे चाहते पठाणचा टीझर पाहून खुश झाले आहेत तर दुसरीकडे, शाहरुखचा पठाण बॉयकॉट करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. (Sushant Singh Rajput's Fans wants Boycott Pathan teending on twitter)


यशराजच्या बॅनरखाली येत असलेल्या शाहरुख खानच्या 'पठाण' सिनेमाचा टीझर पाहिल्यानंतर #BoycottPathan ट्विटरवर ट्रेंड होत आहे. टीझर पाहिल्यानंतर सुशांत सिंग राजपूतचे चाहते संतापले आहेत. 'पठाण' बॉयकॉट करण्याची मागणी करण्यात येत आहे. एका यूजरने शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमच्या फोटोंवर , "संघर्ष सुरूच आहे, आता पठाणची पाळी आहे #BoycottPathan." असं लिहिलं आहे. 

याआधी आमीर खान आणि करीना कपूरची प्रमुख भूमिका असलेला लाल सिंग चड्ढा या सिनेमालाही बॉयकॉट ट्रेण्डचा मोठ्या प्रमाणात फटकाबसला. सिनेमा बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला. तर अक्षय कुमारचा रक्षाबंधन सिनेमाही बॉयकॉट ट्रेंडचा बळी ठरला. अक्षयचा हा सिनेमाहीफ्लॉप झाला. तर विक्रम-वेधा आणि ब्रह्मास्त्र या सिनेमांच्या रिलीज दरम्यानही बॉयकॉट ट्रेण्ड सोशल मीडियावर होता. मात्र, या दोन सिनेमांवरबॉयकॉट ट्रेण्डचा तितकासा परिणाम झाला नाही. आलिया आणि रणबीरची प्रमुख भूमिका असलेल्या ब्रह्मास्त्रला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. आता ट्विटरवर पठाण सिनेमा बॉयकॉट करण्याचा ट्रेण्ड सुरू आहे. त्यामुळे सिनेमाचे निर्माते चिंतेत आहेत. 


'पठाण' शाहरुख खानचा कमबॅक सिनेमा

शाहरुख खानला पुन्हा एकदा सिल्व्हर स्क्रीनवर पाहणे ही प्रेक्षकांसाठी नक्कीच ट्रीट असेल यात शंकाच नाही. चॉकलेट बॉय, रोमॅण्टिक हिरो या इमेजमधून बाहेर पडून शाहरुख आपला अ‍ॅक्शन लूक चाहत्यांना दाखवण्यासाठी उत्सुक आहे. मात्र, त्यादरम्यान सुशांत सिंग राजपूतचे चाहते सिनेमा न पाहण्याची मागणी करत आहेत. तर दुसरीकडे, शाहरुखला सपोर्ट करणारेही अनेकजण असल्याचं दिसत आहे. 

शाहरुख खानचा हा बहुप्रतिक्षित २५ जानेवारी २०२३ रोजी थिएटरमध्ये रिलीज होत आहे. या सिनेमात शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे आता प्रत्यक्षात काय घडणार हे सिनेमा रिलीज झाल्यावरच कळेल. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी