मुंबई : २०२० हे वर्ष बॉलीवूडमधील कोणीही विसरणार नाही. सुशांतसिंग राजपूत, इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्यासह अनेक दिग्गजांनी या जगाचा निरोप घेतला.
त्याचवेळी लॉकडाऊनमुळे बॉक्सऑफिसचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. यावर्षी चर्चेत आलेल्या २० बातम्या जाणून घ्या.
२९ एप्रिल २०२० रोजी अभिनेता इरफान खान यांचे कर्करोगामुळे निधन झाले. इरफान गेल्या दोन वर्षांपासून न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमरशी झुंज देत होता. एका दिवसानंतर ऋषी कपूर देखील कर्करोगाशी लढाई हरले आणि ३० एप्रिल रोजी जगाचा निरोप घेतला.
१४ जून २०२० हा दिवस बॉलीवूडसाठी सर्वात वेदनादायक दिवस ठरला. सुशांतसिंग राजपूतने मुंबईतील आपल्या अपार्टमेंटमध्ये आत्महत्या केली. याशिवाय जगदीप, सरोज खान सारख्या सेलेब्सनीही या जगाचा निरोप घेतला.
सुशांतसिंग राजपूतच्या निधनानंतर त्याची प्रेयसी रिया चक्रवर्तीला अनेक आरोपांचा सामना करावा लागला. ड्रग्ज प्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने रिया चक्रवर्ती आणि शोविक चक्रवर्ती यांना अटक केली. रियाला कोर्टाने जामीन मंजूर केला. याशिवाय तिचा भाऊ शोविक यालाही कोर्टाने जामिनावर सोडले होते. त्याचवेळी सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला.
सुशांतसिंग राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये ड्रग्सची प्रकरणे उघडकीस आली. दीपिका पादुकोण, रकुल प्रीत सिंह, सारा अली खान, श्रद्धा कपूर, अर्जुन कपूर यांच्यासह अनेक सेलेब्सची नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने चौकशी केली. टीव्ही सेलेब्सही ड्रग्जच्या वादातून सुटू शकले नाहीत. कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया यांच्या घरी एनसीबीने छापा टाकला. यानंतर दोघांना अटक करण्यात आली. मात्र नंतर या दोघांनाही जामीन मिळाला.
कोरोनाच्या कहरातून बॉलिवूडसुद्धा सुटू शकले नाही. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चन यांना कोरोनाचा संसर्ग झाला झाले. याशिवाय मल्लिका अरोरा, अर्जुन कपूर यांनाही या आजाराची लागण झाली आहे.
कोरोनामुळे एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन झाले. याशिवाय टीव्ही अभिनेत्री दिव्या भटनागर यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्याचवेळी वरुण धवन, नीतू कपूर आणि कीर्ती सॅनन यांना कोरोनाची लागण झाली होती.
शाहरुख खानची कमबॅक फिल्म पठाण चर्चेत राहिली. या चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन वॉर फ्लिम्सचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे.
२०२० मध्ये अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले. त्याचबरोबर बर्याच बड्या चित्रपटांना आता पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागणार आहे. यात आमिर खानचा लालसिंग चड्ढा, अक्षय कुमारचा सूर्यवंशी आणि रणवीर सिंगचा 83 यांचा समावेश आहे.