सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) आत्महत्येप्रकरणी (Suicide) सतत नव्या गोष्टी समोर येत आहेत. त्याचे वडील कृष्ण कुमार सिंह यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) आणि तिच्या कुटुंबावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. एफआयआरमध्ये (FIR) रियाने सुशांतच्या खात्यातून (account) 15 कोटी रुपये (15 crore rupees) ट्रान्सफर (transfer) केल्याचाही दावा करण्यात आला आहे.
टाइम्स नाऊने सुशांत सिंह राजपूतच्या चार्टर्ड अकाऊंटंटला गेल्या काही दिवसांत त्याच्या खात्यातून खूप मोठी रक्कम काढण्यात आली होती का याबद्दल विचारले. यावर ते म्हणाले, ‘मुंबई पोलिसही मला याबद्दल विचारत आहेत आणि मला याबद्दल बोलण्यास सांगत आहेत. त्यांच्याकडे बँक स्टेटमेंट आहे. या बँकांमधून हा व्यवहार करणे शक्य नाही. कारण त्यात इतकी रक्कम नव्हती.’
सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीसह सहा जणांविरुध्द एफआयआर दाखल केली होती आणि त्यात आरोप केला होता की, रियाने सुशांतच्या खात्यातून 15 कोटी रुपये ट्रान्सफर केले होते. सोबतच त्यांनी रियावर सुशांतच्या ओळखीचा फायदा करून घेण्यासाठी जाणूनबुजून त्याच्याशी ओळख वाढवल्याचाही आरोप केला होता.
स्वतःवर लावण्यात आलेल्या आरोपांबद्दल मौन सोडत रिया चक्रवर्ती म्हणाली, ‘माझा देवावर आणि आपल्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मला न्याय मिळेल असा मला विश्वास वाटतो. माध्यमांमध्ये माझ्याबद्दल अनेक वाईट गोष्टी पसरवल्या जात आहेत, पण मी त्यावर काहीही बोलू इच्छित नाही.’
सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी मुंबईतील वांद्रे इथल्या आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यानंतर गेले काही दिवस तो डिप्रेशनमध्ये असल्याची आणि त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणी मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत.