Sushmita Sen Wedding With Lalit Modi: सुष्मिता सेनने ललित मोदींसोबत लग्न आणि एंगेजमेंटच्या बातम्यांवर मौन तोडलं, नात्याबद्दल इन्स्टाग्रामवर केली पोस्ट

बी टाऊन
Updated Jul 15, 2022 | 19:18 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sushmita Sen Wedding With Lalit Modi: सुष्मिता सेनने 10 वर्षांनी मोठे असलेल्या ललित मोदींसोबतच्या नातेसंबंधावर मौन तोडलेआहे. लग्न आणि एंगेजमेंटच्या बातम्यांदरम्यान अभिनेत्रीने अशी गोष्ट सांगितली की सत्य ऐकून चाहत्यांना आश्चर्य वाटेल.

Sushmita Sen breaks silence on news of marriage and engagement with Lalit Modi, posted on Instagram about the relationship
सुष्मिताने ललित मोदींसोबतच्या बातम्यांबाबत मौन तोडले  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सुष्मिताने ललित मोदींसोबतच्या बातम्यांबाबत मौन तोडले
  • ललित मोदींच्या 'त्या' पोस्टने खळबळ उडवली
  • सुष्मिता सेनने इन्स्टाग्रामवर शेअर केली पोस्ट

Sushmita Sen Wedding With Lalit Modi: आयपीएलचे माजी गव्हर्नर ललित मोदी यांनी सुष्मिता सेनसोबतच्या नात्याची पुष्टी करताच सर्वांच्या नजरा सुष्मिता सेनवर खिळल्या. ललित मोदींसोबतच्या लग्नाच्या आणि एंगेजमेंटच्या वृत्तावर सुष्मिता कधी मौन सोडणार याचीच सर्वांना प्रतीक्षा होती. त्याचबरोबर या सर्व बातम्यांबाबत अभिनेत्रीने 
सोशल मीडियावर एक पोस्ट केली असून तिच्या आजूबाजूला फक्त प्रेम असल्याचे म्हटले आहे, तेही कोणत्याही अटीशिवाय. अभिनेत्रीची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


हा फोटो शेअर केला

सुष्मिता सेनने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टसोबत सुष्मिताने एक फोटोही शेअर केला आहे ज्यामध्ये ललित मोदी अभिनेत्रीसोबत नाहीत, तर तिच्या दोन मुली तिच्यासोबत दिसत आहेत. सोबत एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे.


ललित मोदींसोबतच्या नातेसंबंधावर सुष्मिता म्हणते


या फोटोसह सुष्मिता सेनने ललित मोदीसोबतच्या तिच्या नात्याच्या.. लग्नाच्या बातम्या आणि एंगेजमेंटच्या बातम्यांवर मौन तोडले आहे. अभिनेत्रीने पोस्टमध्ये लिहिले- 'मी त्या ठिकाणी आहे जिथे फक्त आनंदच आनंद आहे. लग्न केलं नाहीये... अंगठी सुद्धा नाही... कुठलीही अट न ठेवता सगळीकडे फक्त प्रेम आहे. आता मी तुम्हाला स्पष्टीकरण दिले आहे... आता तुम्ही तुमच्या आयुष्यावर आणि कामावर लक्ष केंद्रित करा. माझा आनंद शेअर केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. मी तुम्हा सर्वांवर खूप प्रेम करते.

चाहत्यांचे अतूट प्रेम 

सुष्मिता सेनने हे पोस्ट करताच तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर प्रेमाचा वर्षाव सुरू केला. काही चाहते हृदयाचे इमोजी शेअर करत आहेत आणि अभिनेत्रीच्या आनंदात सहभागी होत आहेत.


ललित मोदींच्या या पोस्टमुळे खळबळ उडाली होती


ललित मोदी यांनी 14 जुलै रोजी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून रोमँटिक फोटो शेअर केले आणि लिहिले -'लंडन, मालदीव आणि सार्डिनियामध्ये कुटुंबासोबत वेळ घालवला. सुष्मिता सेनसोबत माझी बेटर हाफ. शेवटी एक नवीन सुरुवात.

ललित मोदींनी हे ट्विट शेअर करत बेटरहॉफ असे लिहिले. त्यानंतर चाहत्यांनी असा अंदाज लावला की सुष्मिता सेनने ललित मोदींसोबत गुपचूप लग्न केले आहे. पण पुढच्याच क्षणी ललित मोदींनी आणखी एक ट्विट केले- 'तुम्हा लोकांच्या स्पष्टतेसाठी. लग्न झालेले नाही.. सध्या एकमेकांना डेट करत आहेत. आणि तेही एक दिवस नक्कीच होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी