मुंबई : स्वरा भास्करने कंगना राणावत यांची उलट-तपासणी घेतली. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात नुकताच फॉरेन्सिक तपास करणार्या डॉ. सुधीर गुप्ता यांनी सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळे झाल्याचे त्यांच्या अहवालात नमूद केले आहे. अभिनेत्याला कोणत्याही प्रकारचे विष दिले गेले नाही किंवा त्याची हत्याही करण्यात आलेली नाही. एम्सच्या या खुलाशानंतर आता अभिनेत्री स्वरा भास्करने ट्विटरवर कंगना राणावत यांच्यावर वार केला आहे. कंगनाच्या पुरस्कारवापसीच्या विधानाला अनुसरुन स्वरा यांनी ट्विट केले.
स्वराने ट्वीट करून लिहिले की, "आता सीबीआय आणि एम्स यांनी सुद्धा सुशांत सिंह राजपूत आत्महत्या करून मरण पावला हे स्पष्ट केलेय ... आणि काही लोक सरकारने दिलेला पुरस्कार परत देणार होते, बरोबर ना?"
Hey! Now thay both CBI and AIIMS have concluded that #SushantSinghRajput tragically died by suicide... weren’t some people going to return their government bestowed awards???
— Swara Bhasker (@ReallySwara) October 7, 2020
सुशांत सिंह राजपूत प्रकरणात, कंगनाने आपले वक्तव्य सिद्ध केले नाही तर ती पद्मश्री पुरस्कार परत करेल असे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या निवेदनात म्हटले होते. कंगनाच्या या विधानाने आता साराने तिच्यावर टीका करत ट्वीट केलेले दिसून येते.
विशेष म्हणजे सुशांतच्या मृत्यूनंतर कंगना, मीडियापासून ते सोशल मीडियापर्यंत खूपच सक्रिय राहिलेली आहे. तिने महाराष्ट्र सरकार आणि बॉलिवूड सेलिब्रिटींवर अनेक आरोप केले, यामुळे बरीच खळबळ उडाली होती.
कंगनाने अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत रिया चक्रवर्तीला आव्हान दिलं होतं. जर सुशांतने आत्महत्या केली हे सिद्ध झालं तर मी माझा पद्मश्री पुरस्कार सरकारला परत करेन असं ती म्हणाली होती. तिच्या याच वक्तव्यावरुन स्वराने तिच्यावर उपरोधित टोला लगावला आहे. “सुशांतने आत्महत्याच केली होती हे आता सीबीआय आणि एम्सच्या रिपोर्टवरुन सिद्ध झालं आहे. कोणीतरी आपला पुरस्कार सरकारला परत देणार होतं ना?” अशा आशयाचं ट्विट करुन स्वराने कंगनाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.