Swara Bhaskar Telugu Mangalsutra : स्वरा भास्करच्या मंगळसूत्राने वेधले लक्ष? या संस्कृतीसोबत आहे खास कनेक्शन

बी टाऊन
Updated Mar 22, 2023 | 19:38 IST | टाइम्स नाऊ मराठी

Swara Bhaskar photos: बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आणि फहाद एहमद यांच्या रिसेप्शनचे काही फोटो समोर आले आहे. ज्यात स्वराने परिधान केलेले बहुमूल्य मंगळसूत्र सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. 

नवरा फहादचा देखील हटके लूक
तेलुगू मंगळसूत्राने वेधले लक्ष   |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • स्वरा भास्करने 6 जानेवारी 2023 रोजी राजकारणी पती फहाद अहमदसोबत कोर्ट मेरिज केले
  • रिसेप्शनमध्ये आलेल्या हाय-प्रोफाइल पाहुण्यांची सर्वत्र चर्चा, राहुल गांधी पासून ते जया बच्चनपर्यत सर्व मोठ्या व्यक्तिमत्वांनी लावली हजेरी
  • बॉलीवूडच्या सौन्दर्यवती फिक्या पडतील असे स्वराच्या गळ्यातले हे मंगळसूत्र ठरले अकर्षणाचा विषय.

Swara Bhaskar Telugu Mangalsutra :  बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या तिच्या लग्नाच्या प्रत्येक फंक्शनचा आनंद घेत आहे. काही दिवसांपूर्वीच दिल्ली येथे स्वरा आणि तिचा राजकारणी पती फहाद अहमद यांच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्यांच्या रिसेप्शनमध्ये आलेल्या हाय-प्रोफाइल पाहुण्यांची सर्वत्र चर्चा पाहायला मिळाली.  

ज्यामध्ये, राहुल गांधींपासून जया बच्चनपर्यंत अनेक मोठ्या व्यक्तिमत्वांनी हजेरी लावली होती.  शिवाय, रिसेप्शनमध्ये स्वराने परिधान केलेले मंगळसूत्र आकर्षणाचा विषय ठरला. बॉलीवूडच्या सौन्दर्यवती फिक्या पडतील असे स्वराच्या गळ्यातले हे मंगळसूत्र इतरांहून वेगळे दिसत होते. स्वराने अश्या अनोख्या डिझाईनचे मंगळसूत्र का घातले असावे, हे आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत.   

हे पण वाचा : ​3 फ्लॉप देऊनही Ranveer Singh हिट, ब्रँड व्हॅल्यूमध्ये विराट कोहलीला टाकले मागे

रिसेप्शनमध्ये राहुल गांधी आणि जया बच्चनची हजेरी 

स्वरा भास्करने 6 जानेवारी 2023 रोजी फहाद अहमदसोबत कोर्ट मेरिज केले. त्यानंतर 13 मार्च 2023 रोजी तेलुगू रितीरिवाजानुसार दोघांनी लग्न केले होते.  त्यामुळे लग्नात आमंत्रित नसणाऱ्या सर्व पाहुणे मंडळींसाठी या जोडप्याने दिल्लीत एक भव्य रिसेप्शन पार्टी ठेवली होती. ज्यामध्ये मोठे दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. या जोडप्याने आपल्या रिसेप्शन पार्टीसाठी फॅशन डिझायनर अबू जानी संदीप खोसला द्वारे डिझाइन केलेले पोशाख निवडले, ज्यामध्ये दोघेही खूप मस्त दिसत होते. 

रेड - गोल्डन रंगाचा लेहंगा स्वराने परिधान केला होता

स्वराने परिधान केलेल्या लाल रंगाच्या लेहेंग्यावर गोल्डन एम्ब्रॉयडरी आणि क्रिस्टल वर्क होते. ज्यात सोन्याच्या तारेने इंटरीकेट एंब्रोइडरी सोबत रंगीबेरंगी पेचवर्क दिसून येत होते, ज्याला सिक्वन आणि गोटा पट्टीने सजवण्यात आले होते. या लेहंग्यावर तिने गुलाबी रंगाचा सिल्क स्लीवलेस ब्लाऊज घातला होता. तिचा हा पेहराव आणखीन खुलून दिसण्यासाठी लाल रंगाची हेवी एम्ब्रॉइडरीची ओढणी तिने घेतली होती. 

हे पण वाचा : ​Suhana Khan Photos शाहरुख खानच्या लेकीने शेयर केले असे फोटोज, बेस्ट फ्रेंड अनन्या, शनाया झाल्या रिएक्ट

तेलुगू मंगळसूत्राने वेधले लक्ष 

स्वराने आपल्या पेहरावाला मॅच होतील असे दागिने घातले होते. गळ्यात पिंक स्टोन पर्ल नेकलेस, मॅचिंग कानातले आणि बिंदी परिधान केली होती. मात्र, तिच्या सौंदर्यात अधिक भर टाकण्याचे काम तिचे मंगळसूत्र करत होते. स्वरा मूळ आंध्रप्रदेशची असल्यामुळे तिने तेलुगू पद्धतीचे मंगळसूत्र घातले होते.

स्वराचे वडील उदय भास्कर आंध्रप्रदेशचे रहिवासी आहे, आणि याच कारणामुळे स्वराने आपल्या लग्नाच्या सर्व रीतीभाती तेलुगू विवाह पद्धतीने केल्या आहेत.  

स्वराने परिधान केलेल्या या दक्षिण भारतीय मंगळसूत्राला 'थाली' असे म्हटले जाते. ही सोन्याची साखळी किंवा पिवळ्या धाग्याने घातली जाते. स्वराचे मंगळसूत्र तेलुगू थाली चेन डिझाइन पद्धतीचे असून ज्यात सोन्याच्या साखळीसह दोन छोटे पेंडेंट जोडलेले आहेत. 

हे पण वाचा : ​Aamir Khan Fitness Secret अमीर खान 58 व्या वर्षी देखील दिसतो इतका तरुण ! या दोन गोष्टीत लपले आहे गुपीत

नवरा फहादचा देखील हटके लूक

दुसरीकडे, नवरदेव फहादचा लूक देखील आकर्षक होता. त्याने बंद गळ्याचा आयव्हरी आणि गोल्डन शेड असलेला नक्षीदार कुर्ता घातला होता, ज्यावर पांढरा पायजमा परिधान केला होता.  

स्वराने या लग्नासाठी #swaadanusaar हा हॅशटॅगही तयार केला होता, जो खूप व्हायरल झाला. 

याआधी स्वराने आपल्या इंस्टाग्रामवर कव्वाली नाइट चे फोटो शेयर केले होते, ज्यात तिने हिरव्या रंगाचा वेल्वेट सूट परिधान केला होता. सुंदर काठ असलेल्या या सूटसोबत तिने नक्षीदार बिंदी, झुमर आणि लांब सोनेरी कानातले परिधान केले होते. तर फहादने हिरव्या रंगाची शेरवानी परिधान केली होती.           

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी