मजुरांच्या मदतीला धावून आली स्वरा भास्कर 

Swara Bhaskar: बॉलिवूड अभिनत्री स्वरा भास्कर ही प्रवासी मजुरांच्या मदतीला धावून आली आहे. प्रवासी मजुरांना आपल्या घरी जाण्यासाठी अडथळे येत आहेत आणि त्या मजुरांना आता स्वरा भास्करची टीम मदत करणार आहे. 

swara bhaskar tweets for helping migrant workers to travel return home lockdown delhi india
स्वरा भास्कर 

थोडं पण कामाचं

  • स्थलांतरीत मजुरांच्या मदतीसाठी स्वरा भास्करचा मदतीचा हात
  • लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांना स्वरा भास्करची टीम करणार मदत 
  • मजुरांना आपल्या घरी पोहोचवण्यासाठी स्वरा भास्करने उचललं महत्वाचं पाऊल 

Swara Bhaskar helps migrant workers: कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर करणअयात आला आहे. सर्वच उद्योगधंदे, व्यापार, दुकाने, कारखाने बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यामुळे स्थलांतरीत मजुरांच्या खाण्या-पिण्याचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आणि त्यानंतर मजुरांनी आपल्या घराकडे परतण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातही राज्य सरकार स्थलांतरीत मजुरांना आपल्या घरी जाण्यासाठी मदत करत आहे ११५४ ट्रेन्सच्या माध्यमातून जवळपास ३० लाख मजूर हे इतर राज्यांतून उत्तरप्रदेशात पोहोचले आहेत. अशाच प्रकारे काही मजूर हे दिल्लीत अडकले आहेत. 

स्थलांतरीत मजुरांच्या मदतीसाठी स्थानिक सरकार, समाजसेवी संस्था आणि बॉलिवूड स्टार्स देखील मदत करत आहेत. यापूर्वी अभिनता सोनू सूद याने मुंबईत राहणाऱ्या उत्तरप्रदेश-बिहार सोबतच दक्षिण भारतातील मजुरांना बसेसच्या माध्यमातून त्यांच्या घरी पोहोचवण्यास मदत केली होती. त्यानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने प्रवासी मजुरांना आपल्या घरी पोहोचवण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. 

स्वरा भास्करने केलं ट्वीट

बॉलिवूड अभिनत्री स्वरा भास्करने ट्वीट करुन ज्या मजुरांना आपल्या घरी जायचं आहे त्यांची माहिती मागवली आहे. स्वरा भास्कने ट्वीट करुन म्हटलं, जर तुम्ही दिल्ली किंवा दिल्लीच्या आसपास राहणारे मजूर असाल किंवा अशा मजुरांना ओळखत असाल ज्यांना उत्तरप्रदेश-बिहार मध्ये आपल्या घरी परत जायचं आहे तर त्यांचे नाव, मोबाइल नंबर आणि आता सध्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणाचं नाव अशी सर्व माहिती भरुन फॉर्म सबमिट करा. आमची टीम तुम्हाला मदत करेल.

माहिती देण्यासाठी फॉर्म

स्वरा भास्कने आपल्या ट्वीटमध्ये एका फॉर्मची लिंक दिली आहे. या लिंकवर क्लिक करुन दिल्ली-एनसीआरमध्ये राहणारे मजूर किंवा त्यांना ओळखणारे त्यांची माहिती भरुन दे शकतात. ही माहिती मिळाल्यावर स्वरा भास्कर आणि त्यांची टीम मिळून या सर्व नागरिकांना घरी पोहोचवण्यास मदत करेल. अभिनेत्री स्वरा भास्करने घेतलेल्या या निर्णयाचं सोशल मीडियात खूपच कौतुक होत आहे. 

स्थलांतरीत मजुरांच्या मदतीला लाल परी

महाराष्ट्रात अडकलेल्या स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकारने एसटी बसेसची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. आतापर्यंत ११ हाजर ३६९ बसेसद्वारे १ लाख ४१ हजारांहून अधिक स्थलांतरत मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्याची व्यवस्था करुन दिली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी