Thappad First Look: तापसी पन्नूच्या थप्पड सिनेमाचा फर्स्ट लूक समोर

बी टाऊन
पूजा विचारे
Updated Jan 30, 2020 | 17:08 IST

Taapsee Pannu Starrer Thappad First Look: तापसी पन्नूचा सिनेमा थप्पडचा फर्स्ट लूक समोर आला आहे. जो लूक खूप दमदार आहे. हा लूक शेअर करताना तापसीनं काय विचारलं आहे. बघा तरी.

Thappad First Look
Thappad First Look: तापसी पन्नूच्या थप्पड सिनेमाचा फर्स्ट लूक समोर  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबईः  बॉलिवूड एक्ट्रेस तापसी पन्नू सध्या आपल्या सिनेमांमुळे खूप चर्चेत आहे. लवकरच तिचा थप्पड सिनेमा रिलीज होणार आहे. ज्याचा फर्स्ट लूक समोर आला आहे. या सिनेमाचा खूप दमदार आहे. या फोटोमध्ये तापसीचा केवळ चेहरा दिसत आहे. तिचे डोळे बंद आहेत आणि केस हवेत उडत आहेत. टिकली लावलेल्या तापसीचा हा फोटो बघून समजत आहे की, कोणीतरी तिला जोरात कानाशिलात लगावली आहे. 

हा सिनेमाचं पोस्टर शेअर करताना तापसीनं लिहिलं की, ही इतकीच गोष्ट आहे का? प्रेमात हे देखील योग्य आहे? ही थप्पडची पहिली झलक आहे. सिनेमाचं पोस्टर समोर येताच याचं कौतुक करण्यास सुरूवात झाली. काही सेलेब्सनी तापसीच्या या पोस्टवर कमेंट करत तिचं कौतुक केलं. एक्ट्रेस नीना गुप्ता यांनी कंमेट केली की, हा फोटो खूप काही बोलून जातोय. दिया मिर्झानं कमेंट करत लिहीलं की, या थापकीचा आवाज दूरदूरपर्यंत ऐकू येईल. तर एक्टर विक्रांत मेसीनं या फोटोला खूप सुंदर असं म्हटलं आहे. 

थप्पड सिनेमा अनुभव सिन्हा डायरेक्ट करत आहे. याआधी तापसी आणि अनुभव यांनी 2018 साली मुल्क सिनेमासाठी एकत्रित काम केलं आहे. थप्पड यावर्षी 28 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. तापसीच्या व्यतिरिक्त रत्ना पाठक, मानव कौल, दीया मिर्झा आणि राम कपूर या सिनेमात दिसतील. 

वर्कफ्रंट बद्दल बोलायचं झाल्यास, तापसी शाबाश मिट्ठू या सिनेमात दिसेल. जो की, भारतीय महिला क्रिकेट टीमची कॅप्टन मिताली राजचा बायोपिक आहे. बुधवारी (29 जानेवारी) ला या सिनेमाचा फर्स्ट लूक समोर आला. जो फॅन्सच्या पसंतीस उतरला. शाबाश मिट्ठू राहुल ढोलकिया यांच्या दिग्दर्शनाखाली बनत आहे. हा सिनेमा पुढच्या वर्षी 5 फेब्रुवारीला रिलीज होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी