Taapsee Pannu's new movie trailer : 'लूप लपेटा'चा ट्रेलर रिलीज, कॉमेडी आणि बोल्ड सीन्सचा तडका

बी टाऊन
Updated Jan 13, 2022 | 16:57 IST | टाइम्स नाऊ मराठी

Taapsee Pannu's Looop Lapeta's trailer released: तापसी पन्नू आणि ताहिर राज भसीन स्टारर 'लूप लपेटा'च्या निर्मात्यांनी आज शानदार ट्रेलर रिलीज केला आहे. सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यानंतर सिनेमा पाहण्याची उत्सुकता आणखीनच वाढलीय. इमोशनल ड्राम, कॉमेडी आणि बोल्ड सीन्सचा तडका या सिनेमात पाहायला मिळणार आहे.

Taapsee Pannu's Looop Lapeta's trailer released
तापसी पन्नू आणि ताहिर राजचा 'लूप लपेटा'चा ट्रेलर रिलीज  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • 'लूप लपेटा'चा ट्रेलर नेटफ्लिक्सवर रिलीज
  • तापसी पन्नू आणि ताहिर राजचा नवा लूक
  • सिनेमात कॉमेडी आणि बोल्ड सीन्सचा तडका

Taapsee Pannu's Looop Lapeta's trailer released: तापसी पन्नू आणि ताहिर राज भसीन स्टारर 'लूप लपेटा'च्या निर्मात्यांनी आज शानदार ट्रेलर रिलीज केला आहे.
सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यानंतर सिनेमा पाहण्याची उत्सुकता आणखीनच वाढलीय. इमोशनल ड्राम, कॉमेडी आणि बोल्ड सीन्सचा तडका या सिनेमात पाहायला मिळणार आहे. 
तापसी पन्नू आणि ताहिर राज यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमात इंटिमेट सीनसह मारहाण, इमोशनल ड्रामाही पाहायला मिळणार आहे. 'लूप लपेटा' ची निर्मिती सोनी पिक्चर्स फिल्म्स इंडिया, इलिपसिस एंटरटेनमेंट आणि आयुष महेश्वरी यांनी संयुक्तपणे केली आहे. आकाश भाटियाने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा सिनेमा ४ फेब्रुवारीला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.


तापसीचे ताहिरसोबत लीप लॉक सीन

2 मिनिटे 25 सेकंदांचा ट्रेलर तापसी पन्नूच्या आवाजाने सुरू होतो, ज्यामध्ये ती म्हणते – आम्हाल रोज मार खाण्याची सवय झाली आहे.  म्हणूनच आम्ही एकमेकांच्या सुखदु:खाचे सोबती झालेलो आहोत. तापसी या सर्व गोष्टी ताहिरला सांगते. व्हिडिओमध्ये दोघांचा लिप लॉक आणि बेड सीन दिसत आहे. तापसी आणि ताहिर या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. तर या दोघांशिवाय इतर सर्व पात्रांचीही झलक सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दिसत आहे. 


इंस्टाग्रामवर ट्रेलर रिलीज करताना, नेटफ्लिक्स निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, "50 लाख, 50 मिनिटे. तुम्ही वेळेनुसार शर्यत जिंकू शकाल? किंवा तुम्ही सर्व काही गमावाल? #LoopalPeta, एक सोनी पिक्चर्स फिल्म्स इंडिया फीचर आणि Ellipsis Entertainment Production. , Taapsee Pannu आणि Tahir Raj Bhasin अभिनीत. #AkashBhatia दिग्दर्शित, 4 फेब्रुवारीला येत आहे, फक्त Netflix वर."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Netflix India (@netflix_in)


हा चित्रपट जर्मन चित्रपटाचा हिंदी रिमेक 

'लूप लपेटा' हा जर्मन चित्रपट निर्माता टॉम टायक्वर यांच्या 1998 च्या क्लासिक 'रन लोला रन'चा हिंदी रिमेक आहे. सिनेमाची कथा खूपच रंजक आहे, ज्यामध्ये एक प्रेयसी आपल्या प्रियकराला वाचवण्यासाठी मिशनवर जाते आणि त्यादरम्यान तिला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. तापसी पन्नू सावीच्या भूमिकेत तर ताहिर राज सत्याच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे.ट्रेलर पाहून सिनेमा पाहण्याची प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढेल असं चित्रपट निर्मात्यांचं म्हणण आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी