तान्हाजी सिनेमातला सैफचा लूक बघून 'असे' होते तैमूरचे रिअॅक्शन

बी टाऊन
पूजा विचारे
Updated Jan 10, 2020 | 10:57 IST

Taimur reaction on Saif Ali Khan Tanhaji look: सैफ अली खानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात त्यानं सांगितलं आहे की, तैमूरनं माझा तान्हाजी सिनेमातला लूक बघून कसं रिएक्ट केलं. 

बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान आणि करिना कपूरचा मुलगा तैमूर अली खान इंडस्ट्रीतला फेवरेट स्टार किड्सपैकी एक आहे. लहान वयातच तैमूरनं बरेच फॅन्स बनवले आहेत. तो मीडियाचा देखील फेवरेट बनला आहे. तैमूर जसा घरातून बाहेर निघतो, मीडियाचे सर्व कॅमेरे त्याच्यावर पडतात. तैमूरचे वडिल सैफचा सिनेमा तान्हाजीः द अनसंग वॉरियर रिलीज झाला आहे. ज्यात तो उदयभान सिंह राठोडची भूमिका साकारत आहेत. 

तान्हाजीमध्ये माझा लूक बघून तैमूर कशी रिअॅक्शन दिली याबाबत काही दिवसांपूर्वी सैफनं सांगितलं. सैफचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात तो सिनेमा आणि तान्हाजीमध्ये आपल्या लूकबद्दल बोलताना दिसत आहे. याच दरम्यान त्यानं हे सुद्धा सांगितलं की, माझा लूक बघून तैमूर काय म्हणाला. व्हिडिओमध्ये सैफ बोलत आहे की, तान्हाजीचा लूक बघून तैमूर सरदार जी सरदार जी बोलायला लागला. मी जेव्हा तयार होत होता तेव्हा तैमूर माझ्याकडेच बघत होता. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Cutest #TaimurAliKhan #SaifAliKhan

A post shared by Manav Manglani (@manav.manglani) on

 

ही पहिली वेळ नाही आहे की, जेव्हा तैमूरनं सैफच्या कोणत्यातरी लूकला बघून रिअॅक्शन दिलं असेल. याआधी सैफचा सिनेमा लाल कप्तानचा ट्रेलर सुद्धा खूप आवडला होता. सैफनं एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तैमूरनं हा (लाल कप्तानचा ट्रेलर) बघू नये, पण तो दरदिवशी बोलतो की, मला तो मारा-मारी ट्रेलर दाखवा. त्या दिवशी मला वाटलं की तैमूर तान्हाजीः द अनसंग वॉरियरबद्दल बोलत आहे. पण त्यानं म्हटलं की तो.. लाल कप्तान. तैमूरला लाल कप्तान सिनेमाचा ट्रेलर खूप आवडला. तो हा ट्रेलर दिवसभरात दोनवेळा बघतो. मला माहित आहे की हे चुकीचं आहे. 

 

 

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, सैफचा तान्हाजी आज म्हणजेच 10 जानेवारीला रिलीज झाला आहे. यात मराठा आणि मुघल यांच्यातलं युद्ध दाखवण्यात आलं आहे. सिनेमात अजय देवगण, सैफ आणि काजोल मुख्य भूमिकेत दिसतील. याव्यतिरिक्त सैफ जवानी जानेमन या सिनेमात दिसतील. या सिनेमात 20 वर्षानंतर तब्बू सोबत दिसणार आहे. जवानी जानेमन या सिनेमातून आलिया फर्निचरवाला बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे.  गुरूवारीच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला असून ट्रेलर खूप फनी आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी