बाबा Saif Ali Khanसोबत छोट्या भावाकडे प्रेमाने बघतोय तैमूर, करीनाने शेअर केला फोटो

बी टाऊन
Updated Apr 16, 2021 | 14:34 IST | टाइम्स नाऊ मराठी

Taimur with Little Baby Brother: करीना कपूर खानने सोशल मीडियावर आपल्या दुसऱ्या बाळाची झलक शेअर केली आहे. यात तैमूर आपले वडील सैफ अली खान यांच्यासोबत बाळाकडे प्रेमाने बघताना दिसत आहे. 

saif ali khan and taimur
बाबा Saif Ali Khanसोबत छोट्या भावाकडे प्रेमाने बघतोय तैमूर 

थोडं पण कामाचं

  • करीना कपूर खानने पुन्हा एकदा शेअर केला दुसऱ्या बाळाचा फोटो
  • तैमूर वडिलांसोत बसून छोट्या भावाकडे प्रेमाने बघतोय
  • सोशल मीडियावर या फोटोवर लाईक्सचा वर्षाव

मुंबई: करीना कपूर खान सध्या सोशल मीडियावर सगळ्यात चर्चेत असलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे. याचे कारण तिचे स्टारडम नव्हे तर चाहते तिच्या दुसऱ्या बाळाची एक झलक पाहण्यासाठी आतुर आहेत आणि यामुळेच फॉलोअर्ससाठी अभिनेत्रीचे सोशल मीडिया अकाऊंट नेहमीच चर्चेचा विषय असत. तैमूर हा सोशल मीडियावरील स्टारडम आहे. मात्र करीनाचे छोटे बाळ कसे दिसत याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. 

काही प्रमाणात करीनाने तिच्या चाहत्यांची ही इच्छा पूर्ण केल आहे. तिने आपल्या सोशल मीडियावर आपल्या कुटुंबाचा एक क्यूट फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. फोटोत पती सैफ अली खान आणि तैमूरसह नवा आणि क्यूट सदस्यही दिसत आहे. करीनाने या फोटोला वीकेंडशी जोडताना आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, माझा वीकेंड असा दिसत आहे...आणि तुमचा?

यावेळी करीना आणि सैफने आपल्या दुसऱ्या बाळाचा चेहरा इंटरनेट आणि सोशल मीडियावर व्हायरल होण्याबाबत संपूर्ण सावधानता बाळगली आहे. आतापर्यंत अभिनेत्रीने आपल्या दुसऱ्या बाळाचा फोटो शेअर केला आहे मात्र चेहरा अद्याप दिसलेला नाही. या  फोटोतही असेच काहीसे दिसले आहे, येथे तिने आपल्या मुलाच्या चेहऱ्यावर किड स्माईलीचा वापर केला आहे. 

दरम्यान, करीनाच्या या दुसऱ्या बाळाचा चेहरा जरी दिसला नाही तरी चाहत्यांसाठी तैमूरसोबतचा त्याचा फोटो खूप खास आहे. तैमूर आपल्या वडिलांसह आपल्या छोट्या क्यूट भावाला आणि कुटुंबातील नव्या सदस्याला ज्या प्रेमाने आणि उत्सुकतेने पाहत आहे त्यानेच सोशल मीडिया युजर्सचे मन जिंकले आहे. करीनाच्या या पोस्टवर सातत्याने हार्ट इमोजीसह भरपूर कमेंटचा वर्षाव पाहायला मिळत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी