तमन्ना भाटियाने दुप्पट किमतीला खरेदी केला लक्झरी फ्लॅट, इंटेरियरवर खर्च करणार इतके कोटी... 

बी टाऊन
Updated Jun 24, 2019 | 20:07 IST | टाइम्स नाऊ मराठी

बाहुबलीची अभिनेत्री तमन्ना भाटियाने मुंबईत नवी घर खरेदी केले आहे. यासाठी तिने दुप्पट किंमत दिली आहे. तसेच या घराच्या इंटेरियवर कोट्यवधी रुपये खर्च करणार आहे. जाणून घ्या किती आहे या फ्लॅटची किंमत 

Tamannaah Bhatia
तमन्ना भाटिया 

मुंबई :  बाहुबली चित्रपटातील अभिनेत्री तमन्ना भाटियाने मुंबईमध्ये एक लक्झरी घर खरेदी केले आहे. या घरासाठी तमन्नाने दुप्पट किंमत मोजली आहे. रिपोर्टनुसार तमन्नाने हे घर ८०,७८८ रुपये प्रति स्केअर फुटांना खरेदी केले आहे. 

डीएनएने दिलेल्या बातमीनुसार तमन्नाने आपले नवे घर जुहू वर्सोवा लिंक रोडवर घेतले आहे. हे घर तिने बिल्डर समीर भोजवानी यांच्याकडून खरेदी केले आहे. हा लक्झरी फ्लॅट इमारतीच्या १४ व्या मजल्यावर आहे. यात तमन्ना हिला दोन गाड्यांचे पार्किंग मिळाले आहे. 

तमन्नाचे हे घर तीन ते चार हजार स्वेअर फुटाचे आहे. या फ्लॅटची किंमत १६.६० कोटी रुपये आहे. बातमीनुसार हे अपार्टमेंट खरेदीची डिल ४.५६ कोटींमध्ये फायनल झाली होती. पण तमन्नाने हे घर दुप्पट किंमतीने खरेदी केले आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

"She's a mess of gorgeous chaos and you could see it in her eyes." ~ Unknown

A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks) on

 

दोन कोटींचे करणार इंटेरियर 

तमन्ना भाटिया या घरात सुमारे २ कोटी रुपयांचे इंटेरियर करणार असल्याचे समजते आहे. या घराच्या खरेदीसाठी तिने सुमारे ९९ लाख ६० हजार रुपये स्टॅम्प ड्युटी भरली आहे. 

या डिल संदर्भात एका ब्रोकरने सांगितले की तमन्नाच्या या घरातून चारही बाजूंनी समुद्राचा क्लिअर व्ह्यू आहे. ही २२ मजली इमारत आहे. या अपार्टमेंटच्या सर्व कोपऱ्यातून सी व्ह्यू मिळतो. तमन्नाला मनाप्रमाणे इंटेरियर करण्यासाठी एक इंटेरियर डिझायनरही भेटला आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#GQBestDressed

A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks) on

 

क्वीनच्या रिमेकमध्ये दिसणार तमन्ना.. 

तमन्ना भाटिया ही कंगना राणावतचा सुपर हिट चित्रपट क्वीनच्या तेलगु रिमेकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव That Is Mahalakshmi आहे.  तसेच ती साय रा नरसिम्हा रेड्डी यातही दिसणार आहे. 

 

 

तमन्ना भाटियाने बॉलिवूड फिल्म हिम्मतवालातून डेब्यू केला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर जोरदार आपटला होता. तमन्नाला बाहुबली चित्रपटातून तिला ओळख मिळाली.  याच्या पहिल्या भागात तिची महत्त्वपूर्ण भूमिका होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
तमन्ना भाटियाने दुप्पट किमतीला खरेदी केला लक्झरी फ्लॅट, इंटेरियरवर खर्च करणार इतके कोटी...  Description: बाहुबलीची अभिनेत्री तमन्ना भाटियाने मुंबईत नवी घर खरेदी केले आहे. यासाठी तिने दुप्पट किंमत दिली आहे. तसेच या घराच्या इंटेरियवर कोट्यवधी रुपये खर्च करणार आहे. जाणून घ्या किती आहे या फ्लॅटची किंमत 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles