KGF 2 craze : टांझानियाच्या काइली पॉलवरही KGF-2 ची नशा, लिप-सिंकसह जबरदस्त अॅक्शन केली

बी टाऊन
Updated Apr 17, 2022 | 12:31 IST | टाइम्स नाऊ मराठी

KGF 2 craze : KGF-2 सध्या टांझानियाच्या इंटरनेट सेन्सेशन काइली पॉलवरही फिव्हर चढलेला आहे. त्याच्या अलीकडील व्हिडिओमध्ये, तो KGF-2 मधील डायलॉगवर लिप-सिंकसह चित्तथरारक अॅक्शन करताना दिसत आहे.

Tanzania's Kylie Paul has cherishing  KGF chapter 2
केजीएफ 2 चा धमाका  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • KGF 2 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली
  • चित्रपटाने 300 कोटींचा टप्पा गाठला
  • यशची जादू टांझानियाच्या कायली पॉलवरही

KGF 2 craze : सोशल मीडियावर, टांझानियन इंटरनेट सेन्सेशन कायली पॉल बॉलीवूड चित्रपट तसेच दक्षिण भारतीय चित्रपटांची गाणी आणि संवादांवर लिप-सिंक व्हिडिओ बनवताना दिसत आहे. जे भारतात झपाट्याने हेडलाइन बनताना दिसत आहेत. आजकाल, सामान्यतः पारंपारिक मसाई ड्रेसमध्ये दिसणारा काइली पॉल वेगळ्या शैलीने भारतीयांची मने जिंकताना दिसत आहे.

काइली पॉलला नुकताच टांझानियातील भारतीय उच्चायुक्तालयाने हिंदी चित्रपट तसेच दक्षिण भारतीय चित्रपटातील गाणी आणि संवादांवर व्हिडिओ बनवल्याबद्दल सन्मानित केले आहे. यावेळी त्याने आपल्या वेगळ्या स्टाईलने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.यावेळी तो सुपरस्टार यशच्या चित्रपट 'KGF Chapter 2' च्या डायलॉगवर लिप-सिंकसह जबरदस्त अॅक्शन करताना दिसत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Kili Paul (@kili_paul)

सुपरस्टार यशचा 'KGF Chapter 2' हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे, ज्याची यशचे चाहते खूप दिवसांपासून वाट पाहत होते. त्याचबरोबर टांझानियाच्या काइली पॉलचे नावही या यादीत सामील झाले आहे. या चित्रपटातील एका डायलॉगवर काइली पॉल लिपसिंक करताना दिसत आहे. 
जे यूजर्सना खूपच आकर्षक वाटत आहे.


कायली पॉलच्या या व्हिडिओने धूम केलेली आहे. बातमी लिहीपर्यंतसुद्धा, 3.4 दशलक्षाहून अधिक दृश्ये प्राप्त झाली आहेत. त्याचवेळी 6 लाख युजर्सनी त्याला लाईक केले आहे. युजर्स सतत त्याच्या व्हिडिओंवर कमेंट करून त्याच्या अभिनयाचे कौतुक करताना दिसतात. त्याचे कौतुक करताना एका यूजरने म्हटले आहे की, 'तुम्हाला लवकरच बॉलिवूडमधून कॉल येईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी