Tapsee Pannu : तापसी पन्नू म्हणते की कॉफी विथ करण 7 मध्ये आमंत्रित करण्याइतके तिचे सेक्स लाइफ मनोरंजक नाही

बी टाऊन
Updated Aug 08, 2022 | 20:55 IST | टाइम्स नाऊ मराठी

Tapsee Pannu : तापसी पन्नूचा (Tapsee Pannu ) दो बारा ( Do Baaraa ) हा सिनेमा येत्या 19 ऑगस्टला रिलीज होत आहे. तापसी सध्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. त्यादरम्यान तिला असा काही प्रश्न विचारण्यात आला ज्याचे उत्तर ऐकून सारेच आश्चर्यचकीत झाले. कॉफी विथ करण शोमध्ये (Koffee with Karan 7 ) सिनेमाच्या प्रमोशनसाठी तापसी पन्नू का आली नाही असा प्रश्न तिला विचारताच, "कॉफी विथ करणमध्ये आमंत्रित करण्याइतके माझे सेक्स लाईफ मनोरंजक नसल्याचं" तापसीने म्हटलं आहे.

Tapsee Pannu says Sex life not interesting to invite in Koffee with Karan 7
तापसी पन्नूचा बेधडक अंदाज  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • तापसी पन्नूचा बेधडक अंदाज
  • सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान तापसीने सांगितले असे काही...
  • 'कॉफी विथ करण 7'मध्ये न बोलावल्याची खंत नाही

Tapsee Pannu : तापसी पन्नूचा (Tapsee Pannu ) दो बारा ( Do Baaraa ) हा सिनेमा येत्या 19 ऑगस्टला रिलीज होत आहे. तापसी सध्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. त्यादरम्यान तिला असा काही प्रश्न विचारण्यात आला ज्याचे उत्तर ऐकून सारेच आश्चर्यचकीत झाले. कॉफी विथ करण शोमध्ये (Koffee with Karan 7 ) सिनेमाच्या प्रमोशनसाठी तापसी पन्नू का आली नाही असा प्रश्न तिला विचारताच, "कॉफी विथ करणमध्ये आमंत्रित करण्याइतके माझे सेक्स लाईफ मनोरंजक नसल्याचं" तापसीने म्हटलं आहे. 


एकता आर कपूर आणि अनुराग कश्यप यांचा दो बारा हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये, तापसी आणि अनुराग चित्रपटाचे प्रमोशन करत असताना, करण जोहर शेजारच्या खोलीत कॉफी विथ करण 7 चे प्रमोशन करत होता.त्याची दखल घेत एका पत्रकाराने अभिनेत्रीला करणच्या शोमध्ये आमंत्रित न करण्याचे कारण विचारले. या प्रश्नाचे उत्तर देताना, अभिनेत्रीने गमतीने सांगितले की तिचे सेक्स लाईफ कॉफी विथ करणमध्ये आमंत्रित करण्याइतके मनोरंजक नाही.

अधिक वाचा : आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा'ची जाणून घ्या नेमकी कथा

कॉफी विथ करणच्या शोच्या प्रोमोमध्ये सेलिब्रिटी त्यांच्या सेक्स लाईफबद्दल मोकळेपणाने बोलतात. अलीकडेच, विजय देवरकोंडाने करणच्या शोमध्ये त्याच्या सेक्स लाईफबाबत अनेक खुलासे केले. आतापर्यंत रणवीर सिंग, आलिया भट्ट, विजय देवरकोंडा, अनन्या पांडे यांसारखे स्टार्स या शोमध्ये सहभागी झाले आहेत.
 


दो बारा लंडन फिल्म फेस्टिव्हल आणि फॅन्टासिया फिल्म फेस्टिव्हल 2022 सारख्या सर्वात प्रतिष्ठित फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात आला. त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दो बारा सह, एकता आर कपूरने कल्ट चित्रपट बाजारात आणले, बालाजी मोशन पिक्चर्स अंतर्गत कल्ट मुव्हीज दाखवण्यात येणार आहेत.  

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

अधिक वाचा :  स्वातंत्र्यदिनानिमित्त खास घोषणा, जागवा देशभक्तीची भावना

तापसीचा दो बारा हा चित्रपट एका अनोख्या संकल्पनेवर आधारित टाइम ट्रॅव्हल चित्रपट आहे. लंडन फिल्म फेस्टिव्हल 2022 मध्ये या चित्रपटाचे खूप कौतुक झाले. दो बारापूर्वी, चित्रपट निर्माते अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांनी मनमर्जियांमध्ये एकत्र काम केले आहे. या चित्रपटात तापसीसोबत विकी कौशल मुख्य भूमिकेत होता. दो बारा व्यतिरिक्त तापसी शाहरुख खानसोबत डंकीमध्येही दिसणार आहे.


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी