Padmini Kolhapure : 'ये गलियां ये चौबारा' रिक्रिएट करताना पद्मिनी कोल्हापुरेच्या डोळ्यात अश्रू, ऋषी कपूरच्या आठवणींना उजाळा

बी टाऊन
Updated Dec 05, 2021 | 16:36 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ye galiya ye chobara : गाण्यांची रिक्रिएटेड व्हर्जन्स हा सध्याचा ट्रेंडच बनला आहे. त्यातच आता भर पडणार आहे पद्मिनी कोल्हापुरे यांच्या या सदाबहार गाण्याची. 'ये गलियां ये चौबारा' हे गाणं त्यांनी स्वत: गायलं आहे. उद्या म्हणजेच 6 डिसेंबरला हे गाण रिलीज होणार आहे.

'Yeh Galiyan Yeh Choubara' recreated by Padmini Kolhapure
'ये गलियां ये चौबारा', पद्मिनी कोल्हापूरे आणि आठवणी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • 'ये गलियां ये चौबारा' रिक्रिएट करण्यात आले आहे
  • 6 डिसेंबरला गाणं होणार रिलीज
  • अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरचा गाण्याला स्वरसाज

Padmini Kolhapure sung 'Ye galiya ye chobara' : गेल्या काही वर्षांत अनेक गाण्यांच्या रिक्रिएटेड व्हर्जन्स पाहायला मिळतात. 
काही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या होत्या तर काही नाकारल्या गेल्या होत्या. दरम्यान, बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक पद्मिनी कोल्हापुरे एका गाण्याच्या रिक्रिएशनमुळे चर्चेत आहे. पद्मिनीने 'प्रेम रोग' या बॉलिवूड चित्रपटातील 'ये गलियां ये चौबारा' हे सुपरहिट गाणे रिक्रिएट केले आहे. 
या गाण्याचे प्रोमोज प्रेक्षकांना आवडत असून ते गाणे रिलीज होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.  मात्र, आता लवकरच प्रेक्षकांची प्रतीक्षा संपणार आहे, 6 डिसेंबरला हे गाणं रिलीज होणार आहे. पद्मिनी कोल्हापूरे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवरून ही माहिती दिली आहे. गाण्याबाबत आतापर्यंत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत, दरम्यान, हे गाणं रिक्रिएट करताना पद्मिनी कोल्हापुरे यांच्या डोळ्यात अश्रू आल्याचेही कळते. अर्थातच त्याचं कारणंही तसंच होतं.

ऋषी कपूर यांच्या आठवणीने पद्मिनी कोल्हापूरे भावूक

अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे, ज्यांनी राज कपूर यांच्या प्रेमरोग चित्रपटातील 'ये गलियां ये चौबारा' हे आयकॉनिक गाणे रिक्रिएट केले आहे, त्या गाण्याच्या शूटिंगदरम्यान पद्मिनी कोल्हापूरे का भावूक झाल्या होत्या, याबद्दल त्या म्हणतात, 1982 मध्ये पद्मिनीने मूळ गाण्यात अभिनय केला होता, या गाण्यात ऋषी कपूर त्यांच्यासोबत होते. त्यामुळे गाण्याच्या शूटिंग करताना पद्मिनी कोल्हापूरे यांना ऋषी कपूर यांची आठवण झाली. ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी हे गाणं गायलं आहे.


ऋषी कपूर सेटवर सगळ्यांना हसवायचे

''दिवंगत अभिनेत्यासोबत गाण्याच्या सीक्वेन्सचे शूटिंग करत असताना, पद्मिनी पुन्हा नॉस्टॅल्जियामध्ये जातात, ज्यावर त्या म्हणतात, "गाण्याच्या शूटच्या मध्यभागी बॅकग्राउंडमध्ये ट्रॅक सतत वाजत होता. अचानक त्या जुन्या आठवणींमध्ये रमल्या, ते दिवस गेले जेव्हा मी ऋषीजींसोबत मूळ गाणे शूट केले. त्यांनी सेटवर आपल्या विनोदाने आणि नम्रतेने सर्वांना हसवले होते.''


आणि पद्मिनी कोल्हापूरेंचे डोळे पाणावले

''पद्मिनी पुढे म्हणाल्या, 'हे भावनिक गाणे होते आणि आम्हाला पात्रात पूर्णपणे उतरायचे होते, पण तरीही ऋषी कपूर नेहमी सर्वांना हसवायचे आणि सगळ्यांसोबत विनोद करत असे. हे सर्व आठवून मी भावूक झालो आणि माझे डोळे पाणावले''


 ६ डिसेंबरला हे गाण रिलीज होणार आहे

पद्मिनी कोल्हापूरेंच्या या गाण्यात एमी मिसोबा आणि अमायरा भाटियासुद्धा अभिनय करत आहेत. हे गाणे सारेगामा आणि धमाका रेकॉर्ड्सने सादर केले आहे आणि प्रियांक शर्मा आणि पारस मेहता यांनी निर्मित केले आहे, जे 6 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी