Brahmstra teaser : ब्रह्मास्त्रच्या 'केसरिया' गाण्याचा टीझर, रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा रोमँटिक अंदाज

बी टाऊन
Updated Apr 11, 2022 | 12:26 IST | टाइम्स नाऊ मराठी

Brahmstra teaser : रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट सध्या त्यांच्या लग्नामुळे खूप चर्चेत आहेत. अयान मुखर्जीने 'केसरिया' या ब्रह्मास्त्र गाण्याचा टीझर शेअर केला आहे.

Teaser of Brahmastra's song 'Kesaria', Ranbir -Alia's hot chemistry
ब्रह्मास्त्रच्या 'केसरिया' टीझर रिलीज  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ब्रह्मास्त्रच्या 'केसरिया' टीझर रिलीज
  • रणबीर आणि आलियाचा रोमॅण्टिक अंदाज
  • आलिया आणि रणबीर लवकरच लग्नबंधनात अडकणार

Brahmastra soulful song Kesariya Starring Ranbir Kapoor & Alia Bhatt: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट सध्या त्यांच्या लग्नामुळे खूप चर्चेत आहेत.रणबीर-आलियाच्या लग्नाबाबत रोज नवनवीन अपडेट्स येत असतात. 14 एप्रिलला रणबीर आणि आलिया लग्नबंधनात अडकणार असल्याचं सांगण्यात येत आहे. लग्नाच्या बातम्यांव्यतिरिक्त, रणबीर-आलिया आगामी 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाबाबतही चर्चेत आहे आणि याचदरम्यान सिनेमाचे दिग्दर्शक अयान मुखर्जीने केसरिया या ब्रह्मास्त्र मधील गाण्याचा टीझर शेअर केला आहे.


रणबीर-आलियाचा हॉट अंदाज

दिग्दर्शक अयान मुखर्जीने ब्रह्मास्त्र चित्रपटाचा टीझर पोस्टर शेअर केला आहे. या व्हिडिओ पोस्टरमध्ये रणबीर आणि आलिया अतिशय रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. पोस्टरमध्ये रणबीर आणि आलियाचे कपाळ एकमेकांवर टेकले असून रणबीरचा हात आलियाच्या कंबरेवर आहे, तर आलियाने रणबीरच्या मानेवर हात ठेवला आहे. या पोस्टरमध्ये दोघेही अतिशय रोमँटिक दिसत आहेत. त्याचवेळी पार्श्वभूमीत केसरिया हे गाणे वाजत आहे, हे गाणं अरजित सिंगने गायलं आहे. ही टीझर पोस्टर शेअर करताना अयानने एक लांबलचक कॅप्शनही लिहिले आहे. ज्यामध्ये अयानने लिहिले, 'तर हे आमचे प्रेमाचे पोस्टर आहे... मला वाटले हीच योग्य वेळ आहे. सध्या प्रेमाला बहर आला आहे. यासोबतच केसरिया गाण्यासाठी अयानने प्रीतम, अमिताभ भट्टाचार्य आणि अरिजित यांची नावे लिहिली आहेत. त्याच वेळी, रणबीर-आलियाच्या सिनेमातील पात्रांची नावं, शिव आणि ईशाची यांच्याबद्दल लिहिताना म्हटले आहे की – प्रेम हे सर्वात मोठे शस्त्र आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ayan Mukerji (@ayan_mukerji)

9 सप्टेंबरला रिलीज होणार सिनेमा

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटात नागार्जुन आणि शाहरुख खान देखील दिसणार आहेत. सिनेमाच्या रिलीजची तारीख अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली आहे आणि आता चित्रपट 9 सप्टेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये रिलीज होईल अशी अपेक्षा आहे. ब्रह्मास्त्र हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये रिलीज होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी