Shamshera Advance Booking: शमशेरा सिनेमाचे आगाऊ बुकिंग 17 तारखेपासून सुरू होणार असून निर्मात्यांनी आखली योजना

बी टाऊन
Updated Jul 16, 2022 | 15:40 IST | टाइम्स नाऊ मराठी

Shamshera Advance Booking: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा शमशेरा हा चित्रपट रिलीज होणार आहे. निर्मात्यांनी 17 जुलैपासून या चित्रपटाची आगाऊ बुकिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

The advance booking of Shamshera movie will start from 17th and the makers have planned
'शमशेरा'चे आगाऊ बुकिंग 17 तारखेपासून सुरू  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अभिनेता रणवीर सिंगचा शमशेरा हा चित्रपट रिलीज होणार आहे.
  • शुक्रवार 22 जुलै रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल होत आहे.
  • 17 जुलैपासून या चित्रपटाचे आगाऊ बुकिंग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Shamshera Advance Booking: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा शमशेरा हा चित्रपट रिलीज होणार आहे. रणबीर कपूरसाठी हा चित्रपट खास आहे कारण या माध्यमातून तो तब्बल चार वर्षांनी सिल्व्हर स्क्रीनवर परतणार आहे. शुक्रवार 22 जुलै रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल होत आहे. या चित्रपटाच्या रिलीजच्या पाच दिवस आधीच निर्मात्यांनी आगाऊ बुकिंग सुरू केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 17 जुलैपासून या चित्रपटाची आगाऊ बुकिंग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रेक्षक 17 जुलैपासून सर्व ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर तिकीट बुक करू शकतील आणि सीट कन्फर्म करू शकतील. बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर, संजय दत्त आणि वाणी कपूर यांच्या चित्रपटाच्या रिलीजसाठी निर्मात्यांनी एक भव्य योजना आखली आहे. या चित्रपटाचे आगाऊ बुकिंग पाच दिवस आधी सुरू व्हावे, त्यामुळे पहिल्याच दिवशी कमाईचा विक्रम करता येईल, अशी निर्मात्यांची इच्छा आहे. तसेच,निर्मात्यांना या चित्रपटासाठी अधिकाधिक स्क्रीन्स हवे आहेत.


पिरियड ड्रामा शमशेरा बिग बजेटमध्ये बनवला गेला आहे. शमशेरा ही एका डाकूची कथा आहे, ज्याचे बजेट 150 कोटी रुपये आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटासाठी रणबीरने 20 कोटी फी घेतली आहे. अशा परिस्थितीत निर्माते सिनेमाबाबत कोणतीही रिस्क घेण्यास तयार नाहीत त्यामुळेच या चित्रपटाच्या प्रमोशनमध्येही मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करण्यात येत आहेत.

अधिक वाचा : Cabinet Decisions : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे ४ निर्णय

अशी आहेत चित्रपटातील पात्रे


शमशेरामध्ये रणबीर कपूर, संजय दत्त आणि वाणी कपूर मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात संजय दत्तची व्यक्तिरेखा शुध्द सिंग नावाच्या पोलीस अधिकाऱ्याची आहे. शमशेरामध्ये रणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहे. वाणी कपूरने डान्सर सोनाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक करण मल्होत्रा ​​आहे.


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी