Kapil Sharma Biopic : कपिल शर्मावर बायोपिक सिनेमा 'फंकार' ची घोषणा, चाहत्यांमध्ये उत्साह संचारला

बी टाऊन
Updated Jan 14, 2022 | 22:20 IST | टाइम्स नाऊ मराठी

Kapil Sharma : कॉमेडियनयनवर बायोपिक चित्रपट बनणार आहे. कॉमेडी किंग कपिल शर्माच्या बायोपिकची घोषणा निर्माते महावीर जैन यांनी केली आहे. या चित्रपटाचे नाव 'फनकार' असे असेल.

Biopic on Kapil Sharma
कॉमेडियनवर बायोपिक येणार, सिनेमाचं नाव 'फनकार'   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कपिल शर्मावर आगामी बायोपिक चित्रपट
  • सिनेमाचे नाव असेल 'फनकार'
  • कॉमेडी किंगवर सिनेमा येणार, महावीर जैन आणणार सिनेमा

Kapil Sharma Biopic : कॉमेडियनयनवर बायोपिक चित्रपट बनणार आहे. कॉमेडी किंग कपिल शर्माच्या बायोपिकची घोषणा निर्माते महावीर जैन यांनी केली आहे. या चित्रपटाचे नाव 'फनकार' असे असेल. हा चित्रपट लायका प्रॉडक्शन अंतर्गत बनवला जाणार आहे. मृगदीप सिंग लांबा या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. त्यांनी 'फुक्रे' चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. 


कपिल शर्मा हा  यशस्वी विनोदी कलाकारांपैकी एक आहे. मेहनत आणि कौशल्याच्या जोरावर त्यांनी चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कपिल आज जो काही आहे, तो त्याच्या कामामुळे आहे. त्याचा इंडस्ट्रीत कोणीही गॉडफादर नव्हता. त्याचा हा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. कपिल शर्माच्या आयुष्यातही अनेक चढ-उतार आले आहेत. 
कॉमेडियनचे चाहते त्याच्या नवीन प्रोजेक्ट्सच्या घोषणेबद्दल नेहमीच उत्सुक असतात. कपिलकडून त्याच्यासाठी एक आनंदाची बातमी येत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

या कॉमेडियनवर बायोपिक  बनणार आहे. कॉमेडी किंग कपिल शर्माच्या बायोपिकची घोषणा निर्माते महावीर जैन यांनी केली आहे. या चित्रपटाचे नाव 'फनकार' असे असेल. हा चित्रपट लायका प्रॉडक्शन अंतर्गत बनवला जाणार आहे. मृगदीप सिंग लांबा या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. त्यांनी 'फुक्रे' चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. 


कपिल शर्माने त्याच्या करिअरमध्ये खूप संघर्ष पाहिला आहे. नैराश्यातून बाहेर येण्यापासून ते सुनील ग्रोव्हरसोबतच्या भांडणापर्यंत, कपिल अनेक गोष्टींमुळे चर्चेत आला
नुकतेच 'द मॅन मॅगझिन'ला दिलेल्या मुलाखतीत कपिल शर्माने सांगितले होते की, आज तो जो काही आहे तो अर्चना पूरण सिंहमुळे आहे. त्यांनी त्यांना खूप मदत केली आहे. त्याच्यामुळेच तो स्टार बनू शकला आहे. कपिल शर्माचा नेटफ्लिक्सवर एक शो येत आहे . 'कपिल शर्माः आय एम नॉट डन येट' हे या शोचे नाव आहे. 28 जानेवारीला हा सिनेमा रिलीज होणार आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी