भयाण स्थितीत आढळला लोकप्रिय पॉर्न स्टारचा मृतदेह, बॉडी पाहून भरला थरकाप

बी टाऊन
भरत जाधव
Updated Jul 19, 2021 | 12:27 IST

पॉर्नसृष्टीतील लोकप्रिय डाहलिया स्कायचा (Dahlia Sky) संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे.

The body of a popular porn star was found
भयाण स्थितीत आढळला लोकप्रिय पॉर्न स्टारचा मृतदेह  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • डाहलिया स्काय ह्यांनी एका दशकात 600 पेक्षा जास्त अॅडल्ट चित्रपटात काम केलं
  • स्कायच्या शरीरावर बंदुकीच्या गोळ्यांच्या खुणा आढळल्या आहेत.
  • डाहलियाने इंस्टाग्रामवर 22 जानेवारी रोजी शेवटची पोस्ट टाकली होती.

नवी दिल्ली : पॉर्नसृष्टीतील लोकप्रिय डाहलिया स्कायचा (Dahlia Sky) संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील (America) लॉस एंजिल्समधील सॅन फर्नांडोमध्ये (San Fernando)  एका कारमध्ये 31 वर्षीय पॉर्न स्टारचा मृतदेह आढळून आला. 

600 पेक्षा जास्त ए ग्रेड चित्रपटात काम केलं

आपल्या करिअरमध्ये डाहलिया स्काय ह्यांनी एका दशकात 600 पेक्षा जास्त अॅडल्ट चित्रपटात काम केलं होतं. त्यांना फिमेल परफॉर्मर ऑफ द ईयरचा अवॉर्ड मिळाला होता. 

शरीरावर आढळल्या गोळ्यांची खुणा 

पोलिसांच्या मते, पॉर्न स्टार डाहलिया स्कायच्या शरीरावर बंदुकीच्या गोळ्यांच्या खुणा आढळल्या आहेत. दरम्यान डाहलिया यांनी स्वता:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली असल्याचा संशय वर्तवण्यात येत आहे. दरम्यान अजून याची स्पष्टता झालेली नाही.

खून झाल्याचा कोणताच पुरावा मिळाला नाही

स्थानिक माध्यामांनुसार, एलएपीडी जासूस डेव पेटेक म्हणाले की, पॉर्न स्टार डाहलिया यांचा मृतदेह 30 जूनला आढळून आला होता. दरम्यान आत्महत्या केल्याची संशयाने या प्रकरणाचा तपास केला जात आहे. दरम्यान अद्याप असा कोणताच पुरावा मिळाला नाही ज्यातून याला आपण हत्या झाल्याचे निष्पन्न होईल. 

ब्रेस्ट कॅन्सरने पीडित होती पॉर्न स्टार

सांगितलं जात आहे की, स्काय ब्रेस्ट कॅन्सर या आजाराने पीडित होती. दरम्यान काही दिवसांपासून त्या नैराश्यात गेल्या होत्या. अॅडल्ट चित्रपटाचे निर्माते हंसने पण स्काय यांच्या कॅन्सर आजाराविषयी स्थानिक माध्यमांना सांगितलं होतं. हंस म्हणाले की, आजारपणाच्या काळात मी त्यांच्या जीवनाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, त्यांच्यासाठी ते सोपं नव्हतं असंही हंस म्हणालेत. 

इंस्टाग्राम पोस्टवरील शेवटची पोस्ट

डाहलियाने इंस्टाग्रामवर 22 जानेवारी रोजी शेवटची पोस्ट टाकली होती. पांढऱ्या टॉपमध्ये पोज देत तिने आपल्या फॉलोअर्सला विचारलं होतं की, तुम्हाला माझ्या आउटफिटविषयी काय वाटतं? त्याच्या या पोस्टवर लोक आता कमेंट करत आहेत. 

यूजर्सच्या कमेंट्स 

एक युजरने लिहिले की, देव तुमच्या आत्म्याला शांती देवो, राजकुमारी तर अजून एक यूजर म्हणालाय की, काय हे खरं आहे? कदाचित असं होऊ नये. देव आपल्या आत्म्याला शांती देवो.  
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी