गोविंदा-कृष्णा अभिषेक यांच्यातील मतभेद संपले, खुद्द गोविंदाच्या भाच्यानेच केले स्पष्ट 

बॉलीवुड अभिनेता गोविंदा (Govinda) चे भाचा कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek) आणि त्याची पत्नी कश्मीरा शाह (Kashmera Shah) सोबतचे नातेसंबंध ताणले गेले होते.

गोविंदा-कृष्णा अभिषेक यांच्यातील मतभेद संपले, खुद्द गोविंदाच्या भाच्यानेच केले स्पष्ट 
The differences between Govinda and Krishna Abhishek ended 
थोडं पण कामाचं
  • बॉलीवुड अभिनेता गोविंदा (Govinda) चे भाचा कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek) आणि त्याची पत्नी कश्मीरा शाह (Kashmera Shah) सोबतचे नातेसंबंध ताणले गेले होते.
  • दोघांच्या कुटुंबादरम्यान मतभेद असल्याच्या गोष्टी 2016 मध्ये  समोर आल्या होत्या.
  • त्याला कृष्णाविषयी कुठलीच तक्रार नाही. अर्थात, त्याआधी कृष्णाने एका पॉडकास्ट शोमध्ये आपला मामा गोविंदाची जाहीर माफीही मागितली होती.

बॉलीवुड अभिनेता गोविंदा (Govinda) चे भाचा कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek) आणि त्याची पत्नी कश्मीरा शाह (Kashmera Shah) सोबतचे नातेसंबंध ताणले गेले होते. दोघांच्या कुटुंबादरम्यान मतभेद असल्याच्या गोष्टी 2016 मध्ये  समोर आल्या होत्या. तेव्हा याबाबत गोविंदा म्हणाला होता, की त्याला कृष्णाविषयी कुठलीच तक्रार नाही. अर्थात, त्याआधी कृष्णाने एका पॉडकास्ट शोमध्ये आपला मामा गोविंदाची जाहीर माफीही मागितली होती. यानंतर असे दिसते, की दोघांमधली दरी आता बुजली आहे. 

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गोविंदाचा भाचा विनय आनंद याने (Vinay Anand) मामा-भाच्याच्या एकत्र येण्यातून घडणाऱ्या विविध कौटुंबिक गोष्टी आणि इतर मुद्द्यांवरही प्रकाश टाकला. 

वादामुळे दुःखी होते विनय आनंद 

विनय आनंद हे भोजपुरी सिनेमाचे (Bhojpuri Cinema) लोकप्रिय अभिनेते आहेत. आता विनय हे ‘मकान’ (Makaan) या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा बॉलीवुडमध्ये कमबॅक करणार आहेत.  या वादाबाबत विनय यांनी माध्यमांना अनेकदा सांगितले होते, की रियल लाईफ आणि रील लाईफ या दोन वेगळ्या गोष्टी असतात. 
 
विनय आनंद यांची इच्छा होती, कृष्णा अभिषेक आणि गोविंदा यांच्यातील मतभेद दूर झाले पाहिजेत. 

विनय आपला भाऊ कृष्णा यांच्यामुळे थोडा निराश वाटतो आहे. विनय यांची इच्छा होती, की त्यांच्या कुटुंबातील सगळे मतभेद दूर व्हावेत. सगळे हसत खेळत एकमेकांसोबत रहावेत. या वादासंदर्भानेच विनयने सोशल मीडिया मंच Koo (कू ऐप) वर घोषणा केली, की आता कृष्णा आणि गोविंदा यांच्यात कसलाही वाद नाही. गोविंदा हेसुद्धा म्हणालेत की, आता कृष्णाला माफी मागायची गरज नाही. तो पूर्वी जसा मोकळेपणाने बोलायचा, तसेच आताही बोलावे, वागावे. हा घरगुती विषय होता आणि आता तो संपला आहे. विनय यांनी यानंतर लिहिले, की कृष्णा माझा सर्वात आवडता छोटा भाऊ आहे आणि गोविंदा माझे मामा आहेत. मी त्यांचा खूप आदर करतो.  

Koo App
में अपने मीडिया से बता देना चाहता हूं , कृष्ण और गोविंदा जी के बीच में कोई विवाद नहीं है , गोविंदा जी कह चुके हैं कृष्ण को माफी मांगने की जरूरत ही नही , वे कभी भी आकार उन से मिल सकते हैं , यह घर की बात है जो सुलझ चुकी है , रही बात मेरी कृष्ण मुझे बहुत प्रिय है , मेरा छोटा भाई है और मामा गोविंदा जी मेरे आदरणीय गुरु हैं 🙏, कृपया मीडिया इस बात को समझे 🙏 और यह बात को लिखे 🙏
 
- Vinay Anand (@vinayanand) 23 June 2022

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी