Film Fest युरोपियन युनियन फिल्म फेस्टिव्हल

The European Union Film Festival आजपासून (सोमवार १ नोव्हेंबर २०२१) युरोपियन युनियन फिल्म फेस्टिव्हल सुरू झाला आहे.

The European Union Film Festival
युरोपियन युनियन फिल्म फेस्टिव्हल 
थोडं पण कामाचं
  • युरोपियन युनियन फिल्म फेस्टिव्हल
  • आजपासून (सोमवार १ नोव्हेंबर २०२१) युरोपियन युनियन फिल्म फेस्टिव्हल सुरू
  • फेस्टिव्हल ३० नोव्हेंबरपर्यंत आहे

The European Union Film Festival । मुंबईः आजपासून (सोमवार १ नोव्हेंबर २०२१) युरोपियन युनियन फिल्म फेस्टिव्हल सुरू झाला आहे. डिजिटल रूपात हा फेस्टिव्हल सुरू आहे. फेस्टिव्हलचे आयोजन डेलिगेशन ऑफ द युरोपियन युनियन टु इंडिया, सदस्य राज्ये, सहकारी देशांद्वारे भारतीय व युरोपियन भागिदारांच्या मदतीने करण्यात आले आहे.

युरोपियन युनियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये आठ विभागातील ३७ भाषांतील ६० चित्रपट बघण्याची संधी मिळेल. या चित्रपटांतून २७ सदस्य राज्ये, सहकारी देशांतील अनोख्या कथा इतिहास कलात्मकतेने गोष्टीरूपात बघता येईल. सत्यजीत रे यांचा पथेर पांचाली दाखवून त्यांना शंभराव्या जयंती निमित्त आदरांजली वाहिली जाईल. धरमशाला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलने खास, आधुनिक भारतीय विभाग तयार केला असून त्यात हिंदी, मराठी, मल्याळम आणि बंगाली या चार भारतीय अधिकृत भाषांमधले सहा चित्रपट दाखवले जातील.  

फेस्टिव्हलमध्ये आठ विभागांचा समावेश आहे. भारताला युरोपची झलक दाखवणाऱ्या या फेस्टिवलमध्ये युरोपियन देशांमधले सिनेमे दाखवले जाणार असून त्यात ऑस्ट्रिया, बेल्जियम, बल्गेरिया, क्रोएशिया, सिप्रस, झेकिया, डेन्मार्क, ईस्टोनिया, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, हंगेरी, आर्यलंड, इटली, लात्विया, लिथुआनिया, लक्सेंम्बर्ग, माल्टा, द नेदरलँड्स, पोलंड, पोर्तुगाल, रोमानिया, स्लोव्हेनिया, स्पेन आणि स्वीडनमधील सिनेमांचा समावेश आहे.

फेस्टिव्हल ३० नोव्हेंबरपर्यंत आहे, फेस्टिव्हल आणि साइड इव्हेंट्सची तिकिटे प्रेक्षकांसाठी मोफत असतील. नोंदणी करुन प्रेक्षक त्यांच्या सोयीने लॉग इन करुन फेस्टिव्हलचा आनंद घेऊ शकतील. नोंदणी https://www.festivalscope.com/page/euff-india-a-window-to-europe/ या लिंकवर सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी