Mirzapur 3: मिर्झापूर 3 मधून समोर आली गुड्डू पंडितची पहिली झलक, जाणून घ्या कधी रिलीज होणार वेबसीरिज

बी टाऊन
Updated May 13, 2022 | 14:06 IST | टाइम्स नाऊ मराठी

Mirzapur 3 Release: मिर्झापूर 3 ची घोषणा झाल्यापासून चाहते त्याच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, वेबसीरिजमधील गुड्डू पंडित म्हणजेच अली फजलच्या एका पोस्टने चाहत्यांची उत्कंठा वाढवली आहे.

The first glimpse of Guddu Pandit came out from Mirzapur 3
मिर्झापूर 3 च्या गुड्डू पंडितची झलक  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मिर्झापूरच्या सीझन 3मधील गुड्डू पंडितचा फर्स्ट लूक
  • लवकरच रिलीज होणार मिर्झापूरचा तिसरा सीझन
  • अली फजलने इन्स्टावर शेअर केला फोटो

Mirzapur 3 Guddu Pandit Look: अॅमेझॉन प्राइमच्या मिर्झापूर या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. मागील दोन्ही सीझनला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर आता निर्माते 'मिर्झापूर 3' रिलीज करण्याची तयारी करत आहेत. दरम्यान, या सीझनमधील गुड्डू पंडितने चाहत्यांची उत्कंठा द्विगुणित केली आहे.


वेबसीरिजच्या शेवटच्या दोन सीझनला मिळालेल्या प्रचंड प्रेमानंतर, निर्मात्यांनी मिर्झापूरच्या सीझन 3 ची घोषणा केली.आता अलीकडेच या सीझनमध्ये गुड्डू पंडितच्या महत्त्वाच्या भूमिकेत दिसणारा अभिनेता अली फजलने स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे, जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा फोटो शेअर करताना त्यांनी 'मिर्झापूर'बद्दल असं काही लिहिलं आहे, जे वाचून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. 

समोर आलेल्या फोटोत गुड्डू पंडितची दमदार शैली पाहायला मिळत आहे. या ब्लॅक अँड व्हाईट फोटोत अली फजल हातात बंदूक घेऊन बसलेला दिसत आहेत कॅमेऱ्यात त्याचे उत्कट भाव पाहायला मिळत आहेत. हे शेअर करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले, 'आणि सुरुवात झाली आहे. तयारी, तालीम, वाचन... लाठी नव्हे, आता खालून शूज आणि वरून बंदुका. लगाओ हाथ कमाओ कांटप, गुड्डू आ रहे हे... अपने आप'

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ali fazal (@alifazal9)

हा फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांच्या आनंदाला उधाण आलं आहे. या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. चाहत्यांसोबतच शोमध्ये गोलूची भूमिका साकारणाऱ्या श्वेता त्रिपाठीनेही कमेंटमध्ये 'वेटिंग' असे लिहिले आहे. मिर्झापूरचा पहिला सीझन 2018 मध्ये आला होता आणि दुसरा 2020 मध्ये आला होता. ही एक क्राइम थ्रिलर वेब सीरिज आहे, ज्यातील पात्रांना खूप पसंती मिळाली आहे.  आता या वेब सीरिजच्या तिसऱ्या भागाच्या रिलीजच्या तारखेची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी