The Kerala Story teaser out : विवेक रंजन अग्निहोत्रीच्या 'द काश्मीर फाईल्स' (The kashmir files) नंतर भारतीय प्रेक्षक आणखी एका शोकांतिकेची आणखी एक दु:खद कथा पाहतील असे दिसते. यावेळी, भारतीय चित्रपट उद्योगातील सर्वात मोठ्या निर्मात्यांपैकी एक असलेले विपुल अमृतलाल शाह ही कथा मांडणारआहेत. वास्तवातील काही घटनांवर आधारित ही सिनेमाची कथा आहे. (the kerala story teaser out story of women who converted to islam and isis slaves)
The Kerala Story, या सिनेमात भारताच्या केरळ राज्यातून गायब झालेल्या महिलांचे अनुभव मांडण्यात आले आहेत. आंखे, वक्त, नमस्ते लंडन, या सिनेमांची समीक्षकांनी कौतुक केलं आहे. आता ते लवकरच 'द केरला स्टोरी' हा नवा सिनेमा घेऊन येत आहेत.
अधिक वाचा : ऑफिसमध्ये स्टायलिश दिसण्यासाठी वापरा या सोप्या टिप्स
सिनेमाच्या टीझरमध्ये केरळमधील महिलांची कथा समोर आली आहे ज्यांची 'ISIS आणि इतर इस्लामिक संघटनांनी' या भागातून तस्करी केली होती. "सिनेमात या कथानकामागील सत्य आणि महिलांच्या वेदना दाखवल्या जाणार आहेत." सिनेमात शालिनी उन्नीकृष्णन या महिलेची भूमिका मांडण्यात आलेली आहे. जिला नर्स व्हायचं होतं. मात्र, तिचं अपहरण करण्यात आलं होतं. तिचा धर्म बदलण्यात आला, आणि आता तिला ISISची दहशतवादी म्हणून अफगाणिस्तान जेलमध्ये ठेवण्यात आलं आहे.
टीझरच्या सुरुवातीलाच ती म्हणते, "माझे नाव शालिनी उन्नीकृष्णन होते आणि मला नर्स बनून मानवतेची सेवा करायची होती. आता मी फातिमा बा, अफगाणिस्तानमधील तुरुंगात इस्लामिक स्टेटची दहशतवादी आहे. मी एकटी नाही. अशा 32,000 मुली आहेत. ज्यांचे धर्मांतर करून सीरिया आणि येमेनच्या वाळवंटात गाडले गेले आहे. केरळमध्ये सामान्य मुलींना दहशतवादी बनवण्याचा एक जीवघेणा खेळ खेळला जात आहे आणि तोही उघड्यावर. त्यांना रोखणारे कोणी नाही का? ही माझी कथा आहे आणि त्या 32,000 मुलींची कथा. ही आहे 'द केरळ स्टोरी'." असे ती म्हणते. अदा शर्माने शालिनी उन्नीकृष्णनची भूमिका साकारलेली आहे.
अधिक वाचा : Mili screening: विकी कौशलचा भाऊ सनीने जिंकली सर्वांची मनं
सिनेमाच्या निर्मात्यांनी सांगितले की, "ही हजारो मुलींच्या दु:खाबद्दलची गोष्ट आहे. निर्मात्यांनी असाही दावा केला आहे की, गेल्या दहा वर्षात इस्लामिक स्टेटमध्ये अनेकांची तस्करी झालेली आहे.