Bollywood Actress : बॉलीवूड स्टार्सच्या आयुष्याशी संबंधित किस्से जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात.लहानपणीचा फोटो असो किंवा कुटुंब किंवा मित्र-मैत्रिणींसोबत घालवलेले क्षण असोत. अशाच बॉलीवूड अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ते पाहून तिला ओळखणे कठीण होत आहे.
फादर्स डे निमित्त तिच्या वडिलांना फादर्स डेच्या शुभेच्छा देण्यासाठी अभिनेत्रीने स्वतः हा बालपणीचा फोटो पोस्ट केला होता.
या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की एक मुलगी तिच्या वडिलांच्या मांडीवर तोंडात अंगठा घालून बसलेली आहे. तिच्यासोबत तिची आईही आहे, जिच्या मांडीवर आणखी एक लहान मूल दिसत आहे. ही मुलगी कॅमेऱ्याकडे बघत असताना तिचे आई-वडील तिच्याकडे पाहून हसत आहेत. जर तुम्हाला अजूनही या बॉलीवूड अभिनेत्रीला ओळखता आले नसेल, तर आम्ही तुम्हाला एक छोटीशी हिंट आम्ही देतो. ही अभिनेत्री आपल्या मनातील गोष्टी बिंधास्तपणे बोलण्यासाठी ओलखली जाते. यासोबतच ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे.
तर, जर तुम्ही या अभिनेत्रीला अजून ओळखले नसेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की, तोंडात अंगठा घालून वडिलांच्या मांडीवर बसलेली ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर आहे, जिने फादर्स डे साजरा केला आहे. बालपणीचा हा फोटो त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
हे शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे- हॅपी फादर्स डे डॅड. तुम्हाला शौर्य पुरस्कार मिळायला हवा, कारण तुम्ही या दोन अत्यंत वाईट मुलांचे संगोपन तर केले आहेच, पण त्यांचा सामनाही केला आहे. स्वरा भास्करचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने त्यावर कमेंट करत आहेत.