Ashram 3 success record: Mx Player ची वेब सिरीज एक बदनाम-आश्रम 3 ने सोशल मीडियावर एकच धूम केली आहे. बाबा निराला यांच्या आश्रमाचे दरवाजे उघडताच भक्तांनी बाबांच्या दर्शनासाठी गर्दी केली आणि अवघ्या 32 तासांत 100 मिलियन वेळा पाहिला गेला आहे. एमएक्स प्लेयरची ही मूळ वेब सिरीज आहे.अवघ्या 3 दिवसांत प्रेक्षकांनी आश्रम 3वर भरभरून प्रेम केले आहे. आश्रम मालिकेचा पहिला सीझन रिलीज झाल्यापासून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दोन सीझनचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले, ज्यामुळे ती भारतीय OTT वर सर्वाधिक पाहिली जाणारी वेबसीरिज बनली.
प्रत्येक सीरिजसोबत ही वेबसीरिज नवीन छाप पाडत असल्याचे दिसते. आश्रमचे पहिले दोन सीझन एकूण 160 दशलक्ष प्रेक्षकांनी पाहिले. सीझन 3 ट्रेलर रिलीज झाल्यापासून सहा तासांच्या आत, हा शो संपूर्ण भारतातील YouTube वर नंबर 1 वर ट्रेंड करत होता. सीझन 3वर प्रेक्षकांनी केलेले प्रेम आणि कौतुक अतुलनीय आहे. 3 जून रोजी रिलीज झाल्यापासून कथा, पात्रे या सर्वांचीच चर्चा आहे.
आश्रम हा एक महान बाबा निराला यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा शो आहे.तो स्वतःला सर्वांपेक्षा श्रेष्ठ समजतो आणि तो देव आहे असे समजतो.हा 'कुप्रसिद्ध' आश्रम समाजात सत्ता आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी महिलांचे शोषण, ड्रग्ज आणि बेकायदेशीर कारवाया करत आहे. दुसरीकडे, निरालाचा बदला घेण्यासाठी पम्मी हे पात्र दिवसरात्र एक करत आहे.
एम एक्स मीडिया प्लेयरचे चीफ कंटेंट ऑफिसर गौतम तलवार म्हणाले, "आम्ही नेहमीच योग्य आणि उत्तम कथा पोहोचवण्याचे ध्येय ठेवतो. आम्ही कथाकारांना उत्तम कथा घेऊन येण्यासाठी प्रोत्साहित करतो जेणेकरून आमचे प्रेक्षक त्या पाहू शकतील. नेहमीच मनोरंजन करण्यात आम्ही तत्पर असतो",असेही गौतम तलवार यांनी सांगितले. आश्रम 3 च्या प्रेक्षकसंख्येमध्ये आश्चर्यकारक वाढ झाली आहे आणि हा पुरावा आहे की सीझन 2 ने 17 तासांपेक्षा कमी कालावधीत 50 दशलक्ष आणि सीझन 3 ने वेबसीरिजच्या अवघ्या 32 तासांमध्ये 100 मिलियन व्ह्यूज ओलांडले आहेत.
निर्माता आणि दिग्दर्शक प्रकाश झा म्हणतात, “आम्हाला आश्रम आणि आतापर्यंत रिलीज झालेल्या सर्व सीझनचा खूप अभिमान आहे. प्रेक्षकांनी पुन्हा एकदा आपले प्रेम दाखवले आहे आणि त्यांच्या प्रतिसादाने आम्ही भारावून गेलो आहोत. संपूर्ण कलाकार आणि क्रू यांनी अथक परिश्रम केले आहेत आणि आम्हाला आनंद आहे की आम्हाला MX Player कडून मोठा पाठिंबा मिळाला आहे.आमच्या प्रेक्षकांचे त्यांनी भरभरून दिलेल्या प्रेमाबद्दल आभार व्यक्त करतो, असेही प्रकाश झा म्हणतात. आश्रम-3 मध्ये बॉबी देओल,अदिती पोहनकर, चंदन रॉय सन्याल, दर्शन कुमार, अनुप्रिया गोएंका, ईशा गुप्ता, सचिन श्रॉफ, अध्यायन सुमन, त्रिधा चौधरी, विक्रम कोचर, अनुरिता के झा, रुशद राणा,
तन्मय रंजन, प्रीती सूद, राजीव सिद्धधर. आणि जया सील घोष प्रमुख भूमिकेत आहेत.