रिलीजच्या अवघ्या ११ तासातच ‘पानिपत’चा भव्यदिव्य ट्रेलर ट्रेडिंगमध्ये

बी टाऊन
Updated Nov 06, 2019 | 15:49 IST | चित्राली चोगले

आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ऐतिहासिक सिनेमा पानिपतचा ट्रेलर नुकताच भेटीला आला आहे. बघता-बघता ट्रेलरने युट्युबवर नंबर एक स्थान पटकवलं सुद्धा. ते देखील रिलीजच्या फक्त ११ तासांमध्ये. 

The magnum opus trailer of much awaited historical film panipat film trends at number 1 within 11 hours of its release
रिलीजच्या अवघ्या ११ तासातच ‘पानिपत’चा भव्यदिव्य ट्रेलर युट्युबवर पहिल्या क्रमांकावर होतोय ट्रेन्ड  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • भव्यदिव्य 'पानिपत' सिनेमाचा ट्रेलर ठरला सुपरहिट
  • रिलीजच्या अवघ्या ११ तासांमध्ये मिळाले ६.६ मिलियन व्ह्यूज
  • ट्रेलमरमधली संजय दत्तची एन्ट्रीची सर्वत्र चर्चा

मुंबई: आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित पानिपत सिनेमा गेले बरेच दिवस चर्चेत आहे. सिनेमाचा ट्रेलर मंगळवारी म्हणजेच ५ नोव्हेंबर रोजी भेटीला येणार असं जाहीर झालं आणि त्याची प्रतीक्षा प्रेक्षक चातकासारखी पाहू लागले. त्याआधी सिनेमाच्या मेकर्सनी प्रेक्षकांना एक सरप्राईज दिलं आणि सिनेमातील महत्त्वाच्या तीन पात्रांचे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज केले गेले. अखेर ठरल्याप्रमाणे पानिपत सिनेमाचा भव्यदिव्य ट्रेलर मंगळवारी सकाळी रिलीज केला गेला आणि बघता-बघता ट्रेलर सुपरहिट ठरला. 

पानिपतचा ट्रेलर अगदी अपेक्षेप्रमाणे लार्जर दॅन लाईफ आहे. रिलीज होताच सोशल मीडियावर ट्रेलरची प्रचंड चर्चा रंगली आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसला. ट्रेलरमध्ये सिनेमाची भव्यदिव्यता अगदी ठळकपणे दिसून आली. तसच सिनेमात असलेला आशुतोष गोवारीकर टच सुद्धा दिसला. आशुतोष गोवारीकर आणि ऐतिहासिक सिनेमे हे एक वेगळेच गणित आहे आणि तेच गणित पुन्हा एकदा जुळून येणार हे पानिपत सिनेमाच्या ट्रेलरने पटवून दिलं आहे. सिनेमाचा ट्रेलर रिलीज होताच सगळीकडे व्हायरल झालेला दिसला आणि रिलीजच्या अवघ्या ११ तासात या पानिपतच्या ट्रेलरने यूट्यूबवर ट्रेंडिंगमध्ये पहिलं स्थान पटकावले सुद्धा. ट्रेलरल रिलीजच्या अवघ्या ११ तासांमध्ये 6.6 मिलीयन व्ह्यूज युट्युबवर मिळाले आहेत आणि हे व्ह्यूज वाढतच चालले आहेत.

 

 

ट्रेलरमध्ये विशेष लक्षवेधी ठरला आहे सिनेमातील पात्रांचा लूक. खास करून संजय दत्तची एन्ट्री फारच भाव खाऊन गेली आहे. सिनेमात संजय दत्त मुख्य खलनायक अहमदशहा अब्दाली साकारताना दिसणार आहे. त्याचा अहमदशहाचा लूक फारच अप्रतिम वाटला असून त्याचा हा खुनशी लूक प्रेक्षकांना प्रचंड आवडताना दिसला. तसंच कृती सनॉन पहिल्यांदाच मराठमोळा लूकमध्ये दिसलेली सुद्धा प्रेक्षकांना आवडली. अर्जुन कपूरबद्दल संमिश्र प्रतिक्रिया आल्या असल्या तरी त्याचा सिनेमातला वावर सध्या तरी चांगला वाटत आहे. सिनेमातील इतर कलाकार मोहनिष बेहल, पद्मिनी कोल्हापुरे आणि झिनत अमान यांच्या पात्रांबद्दल देखील खूप उत्सुकता असलेली दिसून आली.

 

 

सिनेमाचा भव्यदिव्य ट्रेलर सध्या सगळीकडे ट्रेन्ड होत असून या ट्रेलरने सिनेमाच्या उत्सुकतेत भर घातली आहे. येत्या काही दिवसात सिनेमातली गाणी किंवा सिनेमाची अजून काही झलक नक्कीच मिळेल आणि ही उत्सुकता अधिक ताणली जाईल हे निश्चित. पण इतिहासात खूप महत्त्वाचं ठरलेलं पानिपतचे तिसरे महायुद्ध मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पहावी लागणार आहे. पानिपत हा सिनेमा येत्या ६ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी