Tezaab Remake: बॉलिवूडमध्ये रिमेकचा ट्रेंड नवीन नाही. एक चित्रपट येतो आणि काही वर्षांनी त्याचा रिमेक येतो. बॉलीवूडच्या अनेक आयकॉनिक चित्रपटांसोबत असे घडले आहे. आता अशी बातमी आहे की, बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या सुपरहिट चित्रपटाचा रिमेक येणार आहे. तेजाब असे या चित्रपटाचे नाव आहे. 1988 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला होता.
या चित्रपटाने केवळ माधुरी आणि अनिल कपूरची जोडी या सिनेमामुळे नुसतीच हीट झालेली नाही , तर माधुरीच्या करिअरला एक नवी उंचीही दिली. माधुरी केवळ तिच्या डान्समुळेच फिल्मी दुनियेत आहे, असे पूर्वी बोलले जात होते. पण तेजाब या चित्रपटाने सर्वांची बोलती बंद केली आणि प्रेक्षक तिच्या अभिनयाचे वेडे झाले.
या चित्रपटातील 'एक दो तीन चार' हे गाणे आजही अनेकांच्या तोंडी आहे. या चित्रपटाच्या रिमेकचा दावा टाईम्स ऑफ इंडियाच्या एक्सक्लुझिव्ह रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. ETimes शी बोलताना निर्माता मुराद खेतानी यांनी सांगितले की त्यांनी एन चंद्राच्या या सुपरहिट चित्रपटाचे हक्क घेतले आहेत. मात्र, या चित्रपटाच्या रिमेकवर एन चंद्रा यांनी आक्षेप घेतला आहे. चंद्रा म्हणाले, तेजाबसारख्या प्रतिष्ठित चित्रपटाशी छेडछाड करू नये.
एन चंद्रा म्हणाले की, तेजाबचा रिमेक व्हावा असे मला वाटत नाही. मी स्वतः याचा विचार करू शकत नाही. क्लासिक चित्रपटांना स्पर्श करण्याची गरज नाही. त्या चित्रपटाची कथा त्या काळातील आहे. ती एक काळ होता आणि त्या काळाचा रिमेक असू शकत नाही. चंद्रा यांच्या मतभेदावर मुराद खेतानी यांचे विधान आलेले नाही. दुसरीकडे, मुराद यांच्या बाजूने आणखी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. चित्रपटाची कथा, कलाकार इत्यादी तपशीलांसाठी आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागेल