गमावली एक प्रिय गोष्ट, अनुपम खेर यांना आपल्या आगामी चित्रपटासाठी द्यावे लागले हे बलिदान

 दिग्गज अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) सध्या थोडेसे दु:खी आहेत. अभिनयाच्या प्रवासात त्यांना नुकताच एका गोष्टीचा त्याग करावा लागला आहे. सोशल मीडियावर पोस्ट टाकत त्यांनी स्वत:च या गोष्टीची माहिती दिली आहे. एक व्हीडिओही त्यांनी पोस्टसोबत टाकला आहे.

The sacrifice that Anupam Kher had to make for the upcoming film
अनुपम खेर यांना आगामी चित्रपटासाठी द्यावे लागले हे बलिदान 

मुंबई : दिग्गज अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) सध्या थोडेसे दु:खी आहेत. अभिनयाच्या प्रवासात त्यांना नुकताच एका गोष्टीचा त्याग करावा लागला आहे. सोशल मीडियावर पोस्ट टाकत त्यांनी स्वत:च या गोष्टीची माहिती दिली आहे. एक व्हीडिओही त्यांनी पोस्टसोबत टाकला आहे. (The sacrifice that Anupam Kher had to make for the upcoming film)

आपल्या सुरेख अभिनयातून फिल्म इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख बनवणारे अभिनेते अनुपम खेर, पुढच्या काही काळासाठी दाढी-मिशीविना दिसणार आहेत. ही माहीती अनुपम खेर यांनी शुक्रवारी सकाळी स्वदेशी सोशल मीडिया मंच 'कू'वर एक खास व्हीडियो शेयर करत दिली.

अधिक वाचा : जान्हवीच्या आवडत्या वॉटर बॉटलचं नाव फारच विचित्र

थोडा दुखी, थोडा फनी अशा मूडमध्ये रेकॉर्ड केलेल्या या व्हीडिओमध्ये अनुपम ट्रिमरने स्वत:च्या मिशा काढताना आणि त्यामुळे उदास होताना दिसत आहेत. आपल्या आगामी चित्रपटाच्या व्यक्तीरेखेला संपूर्ण समर्पण देत साकारण्याची तयारी करत असलेल्या अनुपम यांनी वीडियो शेयर करत लिहिले, "मिशा किती लवकर निघून गेल्या...
Moustache had to go for my 527th film. (Will give details soon). बाल बाल… नहीं बचे!! #HairTodayGoneTomorrow"

सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असणारे अनुपम खेर काही काळापूर्वीच कश्मीरी पंडितांच्या आयुष्यावर आधारित सिनेमातल्या आपल्या ताकदीच्या अभिनयामुळे चांगलेच चर्चेत आले होते. या व्हीडिओमध्ये खेर यांनी या आगामी चित्रपटाचे नाव सांगितले नाही मात्र कामासाठी असे बलिदान देण्याचा सल्ला मात्र दिला. अनुपम खूप कमी चित्रपटांमध्ये मिशांविना दिसतात. मात्र केसांची समस्या त्यांनी पूर्वीपासूनच आहे. 28 च्या वयात 60 वर्षांच्या व्यक्तीची भूमिका करणारे खेर रंगभूमीवरच्या गाजलेल्या कलाकारांपैकी एक आहेत. असंख्य व्यक्तीरेखांना त्यांनी आजवर कमालीच्या ताकदीने सजीव केले आहे.

अधिक वाचा : निरनिरळ्या कपड्यांमधील सईचे मनमोहक लूक

अभिनेता अनुपम खेर यांनी काही दिवसांपूर्वीच आपला आगामी सिनेमा 'कागज 2' ची घोषणा केली. या सिनेमात अनुपम खेरसोबतच पंकज त्रिपाठी, मोनल गज्जर, सतीश आणि अमर उपाध्यायसुद्धा दिसतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी