Dhanush Movie : धनुषच्या द्विभाषिक सिनेमाच्या शूटिंगला आजपासून सुरुवात होत आहे. औपचारिक पूजा करून सिनेमाचा मुहूर्त करण्यात आला. हा सिनेमा तेलगू आणि तामिळ या दोन भाषांमध्ये होणार आहे.
वेंकी अटलुरी यांनी दिग्दर्शित केलेला धनुषचा द्वैभाषिक चित्रपट तेलगूमध्ये सर आणि तामिळमध्ये वाथी नावाने होणार आहे. हैदराबादमध्ये औपचारिक पूजेसह आज या सिनेमाचा मुहूर्त करण्यात आला आहे. या सिनेमात धनुष आणि संयुक्ता मेनन प्रमुख भूमिकेत आहेत. यांची नवी केमिस्ट्री सिनेमात पाहायला मिळणार आहे.
चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर पूजा समारंभातील काही फोटो शेअर केले आहेत. धनुष कॅज्युअल पांढऱ्या शर्ट आणि पॅन्टमध्ये देखणा दिसत होता, तर संयुक्ताने पारंपरिक पोशाखात कार्यक्रमाला उपस्थिती लावली. आजपासून या चित्रपटाचे शूटिंग हैदराबादमध्ये सुरू होत असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. वेंकी अटलुरी यांच्या दिग्दर्शनाखाली धनुष या सिनेमाच्या माध्यमातून तेलुगुमध्ये पदार्पण करेल. पवन कल्याण स्टारर भीमला नायक नंतर सर हा संयुक्ता मेननचा दुसरा तेलुगु चित्रपट आहे.
हा चित्रपट शिक्षण माफियांवर भाष्य करणारा एक पीरियड सोशल ड्रामा असल्याचे म्हटले जाते. शिक्षणाच्या खाजगीकरणाविरुद्ध एका तरुणाचा संघर्ष या चित्रपटात मांडण्यात आला आहे. सितारा एन्टरटेन्मेंट सूर्यदेवरा नागा वंशी आणि फॉर्च्युन फोर सिनेमाच्या सुश्री साई सौजन्या
यांचे आहे. या सिनेमात जी.व्ही.प्रकाश यांचे संगीत आणि दिनेश कृष्णन यांची सिनेमॅटोग्राफी आहे.