[VIDEO] The Sky is Pink चा ट्रेलर आऊट, प्रियंकाचं दमदार कमबॅक

बी टाऊन
पूजा विचारे
Updated Sep 10, 2019 | 13:45 IST

बॉलिवूड एक्ट्रेस प्रियंका चोपडाचा कमबॅक सिनेमा द स्काय इज पिंकचा ट्रेलर आज रिलीज करण्यात आला आहे. २०१६ नंतर प्रियंकानं बॉलिवूडमध्ये कमबॅक केलं आहे. बघा प्रियंकाचा हटके लूक. 

The Sky is Pink poster
The Sky is Pink चा ट्रेलर आऊट, प्रियंकाचं दमदार कमबॅक  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • बॉलिवूड एक्ट्रेस प्रियंका चोपडा सध्या आपला अपकमिंग बॉलिवूड सिनेमा द स्काय इज पिंक मुळे चर्चेत आहे.
  • या सिनेमाच्या माध्यमातून प्रियंका बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे.
  • या सिनेमाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे.

The Sky is pink trailer Out, Priyanka Chopra's Bollywood comeback: बॉलिवूड एक्ट्रेस प्रियंका चोपडा सध्या आपला अपकमिंग बॉलिवूड सिनेमा द स्काय इज पिंक मुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून प्रियंका बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. या सिनेमाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. तीन मिनिटांचा असलेला ट्रेलर बराच दमदार दिसतोय. ट्रेलरमध्ये प्रियंकाचा एक वेगळाच अंदाज येथे बघायला मिळतोय. हा सिनेमा अनेक प्रकारे खास आहे. प्रियंका तर २०१६ नंतर या सिनेमातून कमबॅक करत आहे. काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड राम राम करणारी जायरा वसीम सुद्धा या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

हा सिनेमा गुरूग्राममध्ये राहणारी १३ वर्षांची मोटिवेशनल स्पीकर आयशा चौधरीवर आधारित आहे. आयशाला इम्यून डिफिशिएंसी डिसऑर्डरची समस्या होती. ज्यामुळे तिचं २०१५ साली निधन झालं. आयशानं टॉक शोजमध्ये दिलेल्या व्याख्यानामुळे प्रसिद्ध झाली होती. फरहान आणि प्रियंका या सिनेमात आयशाच्या पालकांची भूमिका साकारताना दिसतील. 

 

 

 

द स्काय इज पिंक हा सिनेमा येत्या ११ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. एसके ग्लोबल आणि पर्पल पेबल पिक्चर्स यांनी एकत्र मिळून हा सिनेमा आरएसव्हीपी आणि रॉय कपूर फिल्म्सनं प्रोड्यूस केला आहे. या सिनेमाची निर्मिती शोनाली बोस करत आहे. या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर टक्कर सैफ अली खानचा लाल कप्तानशी होणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी